फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे डाॅ. संजय भोयर यांची अध्यक्षपदी निवड
बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि. 25जुलै):-स्थानिक पुसद तालुका कार्यकारीणीची निवड मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. वंदना वानखडे ह्या होत्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन यवतमाळ जिल्हाकार्यकारिणीच्या वतीने जिल्हा नुटा उपाध्यक्षा डाॅ. रजनी भोयर यांनी पूर्ण कार्यक्रम पार पाडला तर माजी नुटातालुका सचिव प्रा. उल्हास चव्हाण विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते
या सभेमधे नुटा तालुका कार्यकारीणी मधे अध्यक्ष म्हणून फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसदचे डाॅ. संजय भोयर, उपाध्यक्ष-डाॅ. सुनिल खाडे, फु. ना. महा. पुसद, सचिव म्हणून वत्सलाबाई नाईक महा. पुसदच्या डाॅ. अरुणा पवार, तसेच सहसचिव-डाॅ. प्रवीण फाळके, सदस्य-डाॅ. उज्वला तिखे, सदस्य-डाॅ. अभय गायकवाड, बा. ना. अभि. महा., पुसद, सदस्य-प्रा. निलेश चिमणकर यांची अविरोध निवड झाली आहे.
याप्रसंगी संघटनेची भूमिका प्रा. उल्हास चव्हाण यांनी मांडली. व. ना. महा. च्या कार्यकारी प्राचार्य डाॅ. वानखडे मॅडम यांनी अध्यक्षस्थान भूषविले. पुसद तालुक्यातील विविध महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक उपस्थित होते. बिनविरोध निवड झाल्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले.




