Home Breaking News दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक

दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक

102

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

पुसद(दि.24जुलै):-ग्रामीण पोलीस स्टेशन अप क्रमांक 584 /2023 कलम 302, 143, 144, 147, 148, 149 भादवी मधील फिर्यादी बाळू आनंदा भगत वय 42 वर्ष राहणार श्रीरामपूर पुसद जिल्हा यवतमाळ यांनी फिर्याद दिली की, दिनांक 20-7-2023 रोजी रात्री 8 वाजता चे दरम्यान फिर्यादीचा पुतण्या संघदीप संजय भगत वय 23 वर्ष यास बजरंग नगर पाण्याची टाकीजवळ पुसद येथे प्रवीण सूर्यवंशी, भूषण जोगदंडे, आशिष सूर्यवंशी, वैभव टेंबरे, रोहन जोगदंडे असे सर्वांनी मिळून संगणमत करून जुन्या वादाचे कारणावरून डोक्यात दगड घालून जीवाने ठार मारले आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचे तपास कामी पुसद ग्रामीण पथक स्थानिक गुन्हे शाखा पुसद पथक व पुसद शहर डीपी पथक अशी वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली.

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पुसद शहर डीपी पथकाला आरोपी हे पुणे येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती समजल्याने त्याबाबत अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप साहेब व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री पंकज अतुलकर साहेब यांना माहिती देऊन त्यांचे परवानगीने पुसद शहर डीपी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार प्रफुल इंगोले पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाभुळकर पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ पवार यांचे पदक दिनांक 21-7-2023 रोजीचे मध्यरात्री पुणे करिता रवाना झाले.

प्राप्त माहिती नुसार पुसद शहर डी बी पथकाने सदर आरोपींना पुणे शहरात विविध ठिकाणी अतिशय जिद्दीने व चिकाटीने शोध घेतला असता सदर आरोपी पैकी आरोपी क्रमांक एक रोशन दिलीप जोगदंडे वय 23 वर्ष राहणार भीम नगर पुसद क्रमांक दोन आशिष अशोक सूर्यवंशी वय 23 वर्ष राहणार भीम नगर पुसद क्रमांक तीन वैभव बापूराव टेंबरे वय 21 वर्षे राहणार बोरगडी पुसद जिल्हा यवतमाळ हे पुणे वाघोली येथील वाघेश्वर मंदिर परिसरात असल्याचे समजल्याने सापळा रचून अतिशय कौशल्य पूर्ण रीतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डीबी पथक हे आरोपींना ताब्यात घेऊन आज रोजी पुसद येथे दाखल झाल्याने पुढील तपास कामी सदरचे आरोपी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड साहेब, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली पुसद शहर पोलीस निरीक्षक श्री उमेश बेसरकर सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले सहायक पोलीस निरीक्षक प्रेम कुमार केदार यांचे सूचनाप्रमाणे डी.बी प्रमुख पो. उपनिरीक्षक शरद लोहकरे पो. हवालदार प्रफुल इंगोले पो. कॉ. शुद्धोधन भगत, पो. कॉ. वैजनाथ पवार पोलीस कॉ. आकाश यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here