Home पुणे जोतिबाचीवाडी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी दादासाहेब भगत उपाध्यक्षपदी विलास जगताप

जोतिबाचीवाडी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी दादासाहेब भगत उपाध्यक्षपदी विलास जगताप

94

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.22जुलै):- शाळा ही समाजाचा आरसा असते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शाळा,शिक्षक हे महत्वपूर्ण घटक आहेत.शाळेतील नियंत्रण तसेच सहकार्याच्या भुमिकेसाठी शालेय शिक्षण समिती गरज लक्षात घेता भुम तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथील शाळेत सतरा सदस्यांची शालेय शिक्षण समिती गठित करत अध्यक्षपदी दादासाहेब भगत तर उपाध्यक्षपदी विलास जगताप यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोतिबाचीवाडी’चे मुख्याध्यापक मारुती कोकाटे, सहकारी शिक्षक सेवक भगत, आण्णासाहेब चव्हाण ,धन्यकुमार दाहितोड, रंजित पाटील रविंद्र राऊत, मच्छिंद्र सोनवणे, वसंत भिसे गावचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———-

विद्यार्थी हे गावच्या उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. ते अधिक सक्षम करण्याची जबाबदारी शिक्षकांची असते; “शाळा आणि गाव यांचा योग्य समन्वय व्हावा विद्यार्थ्यांच्या समृद्ध शैक्षणिक वाटचालीसाठी शालेय शिक्षण समिती कायमच सकारात्मक विचारांनी कार्यरत राहिली तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडत योग्य ते परिवर्तन निश्चितच ठरलेलं असते.शालेय शिक्षण समिती नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांना यशस्वी कार्यासाठी सदिच्छा.

– लक्ष्मण जाधव
(जोतिबाचीवाडी शिक्षणप्रेमी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here