Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी यांचा...

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी यांचा धडक मोर्चा

180

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.21जुलै):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी महिला धडक मोर्चा.पंचायत समिती उमरखेड अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अभियानामध्ये जवळपास पाच ते सहा वर्षापासून काम करीत असलेले महिला कॅडर व कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीसाठी व विविध मागण्यासाठी उमरखेड येथे महिलांचा धडक मोर्चा काढण्यात आला.

उमरखेड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या माध्यमातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता.

पंचायत समिती उमरखेड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुसद रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गे तहसील कार्यालय उ व उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड या ठिकाणी हा मोर्चा धडकला होता.तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील शेकडो महिलांनी या मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here