Home Breaking News दुहेरी हत्याकांडाने पुसद शहर हादरले

दुहेरी हत्याकांडाने पुसद शहर हादरले

148

[घटनेच्या अनुषंगाने पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता]

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

पुसद(दि.21जुलै):-शहरातील विठाळा वॉर्ड येथे रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांडाची थरारक घटना घडली आहे.सदर हत्याकांड जुन्या वादाच्या कारणावरुन झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठाळा वार्ड येथे बुधवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान जुन्या वादाच्या कारणावरून सहा जणांनी कट रचून राहुल हरिदास केवटे वय 45 वर्ष आणि क्रिश विलास केवटे वय 23 वर्ष तसेच बंटी हरिदास केवटे यांच्यावर घरावर येउन दार ठोकले, दार उघडताच आरोपींनी धारदार हत्याराने हल्ला चढविला. या हल्ल्यात राहुल केवटे आणि क्रिश केवटे हे दोघे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर बंटी हरिदास केवटे हे गंभीर जखमी झाला आहे. हत्यांकड घडवून सर्व आरोपी तेथून पसार झाले.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून मृतदेह शवच्छेकरीता उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी नयन अनिल केवटे राहणार विठाळा वार्ड यांची फिर्यादीवरून आरोपी पवन बजीराव वाळके, निलेश दीपक थोरात,गणेश संतोष तोरकड, गोपाल शंकर कापसे, गणेश शंकर कापसे, अवि चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींचा शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच संताप व्यक्त केला असून या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर करवाई करण्याची मागणी केली आहे.सदरील आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून या अगोदर सुद्धा त्यांनी मृतकासोबत वाद घातला होता. अशी चर्चा रुग्णालय परिसरात सुरू होती.शासकीय सामान्य उपजिल्हा रुग्णालय पुसद, पुसद परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here