अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.19जुलै):-शहरातील सिध्दार्थ नगर येथील रहिवासी जेष्ठ विधिज्ञ ॲड.मिलिंद भगवानराव क्षिरसागर यांना ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एडवोकेट ॲन्ड असोसिएशन दिल्ली या संस्थेचा सर्वोत्कृष्ट विधिज्ञ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.ॲड.क्षिरसागर हे गेल्या १५ वर्षांपासून वकीली क्षेत्रात कार्यरत आहेत. चळवळीशी बांधिलकी जोपासून ते गरजूंना कायदेशीर मदत करतात. ते मितभाषी असल्याने त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. सामाजिक क्षेत्रातील तरूणांशी त्यांचा चांगला संवाद आहे. तालुका वकील संघाच्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. सध्या ते आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून ते वकीली करतात. सामाजिक चळवळीत कायदेशीर मदत तसेच अन्याय व अत्याचार विरूद्ध लढा उभा करतात. त्यांच्या अशा भरीव योगदानाची दखल घेवून वकीली क्षेत्रातील नामांकित संस्थेने त्यांची सर्वोत्कृष्ट विधिज्ञ पुरस्कारासाठी निवड केली आहे. येत्या २८ जुलै रोजी कल्याण शहरातील आचार्य अत्रे रंगमंदिर सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार ॲड.मिलिंद क्षिरसागर यांना देण्यात येणार आहे.
दरम्यान, गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी ॲड.क्षिरसागर याचे पुरस्कार निवडीबद्दल पेढे भरवून अभिनंदन केले आहे. तसेच मित्र परिवारानेही शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून ॲड.क्षिरसागर यांचे स्वागत केले आहे.
यावेळी जेष्ठ मुख्याध्यापक माणिक नागरगोजे, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जाधव, ॲड.अनिल सावंत, ॲड.राम गायकवाड, पत्रकार पिराजी कांबळे, रेल्वे अधिकारी शिवाजी दौंड, स्वीय सहाय्यक कवी विठ्ठल सातपुते, ॲड.सुनिल कागणे, ॲड.जितेंद्र सोनसळे, राहूल काचोळे, बाबा पोले, राजेबापू सातपुते, विजय साळवे, ॲड.भागवत मुंडे, ॲड.अमोल गायकवाड, ॲड.संतोष मुंढे, ॲड.विवेक निळेकर, प्रभाकर सातपुते, इंजिनिअर मिलिंद पारवे, अनिल मस्के उपस्थित होते.
