




✒️जळगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)
जळगाव(दि.19जुलै):- अण्णा भाऊ साठे यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात कम्युनिस्ट पार्टीतुन झाली , पक्ष वाढत राहावा म्हणून त्यांनी आपले सम्पूर्ण जीवन व्यतीत केले ,पक्षा करीता मोठ्या प्रमाणात पैसा उभा केला , देशभरात दौरे केले , पण कम्युनिस्ट पक्षाने त्यांना कोणतेही मानाचे पद वा स्थान दिले नाही .असे परखड़ मत प्रसिद्ध साहित्तिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जळगाव येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आयोजीत कार्यक्रमात वाघ बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , या देशात मागास समाजाची नेहमीच कुचेष्टा करण्यात आली आहे . त्यांच्या कार्याला , विद्वत्तेला , व्यक्तिमतवाला डावलन्यात आले व त्यांच्यावर अन्याय , अत्त्याचार करण्यात आले . या व्यावस्थेच्या विरोधात १८ व्या शतकात महात्मा फुले यांनी बंड केले , त्या बंडाची धुरा अण्णा भाऊ यांनी कार्ल मार्क्स यांच्या विचारांनी प्रेरीत होवून आपल्या खांद्यावर घेतली खरी पण ते मागस समाजाच्या उन्नति करीता न लढता सर्व जाती धर्माच्या कामगारां करीता लढले , कामगार नेते म्हणून त्यांना ओळख मिळाली पण पुढं कामगारांनी , पक्षाने त्यांना वाळीत टाकले व त्यांचे पूर्ण जीवन , कार्य , चळवळ व सारेकाही उध्वस्त झाले . हा इतिहास सर्वच मागास समाजीतिल कार्यकर्त्यांनी लक्षात ढेवावा .
कार्यक्रमाच्या सुरवातीस अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रीय लहूशक्ती चे विभागीय अध्यक्ष रमेश कांबळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले , सामाजिक कार्यकर्ते नामदेव मोरे यांनी दीपप्रज्वलन केले .राजेश कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की , अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण करीता दहा लाख रुपये स्थानिक आमदार निधी मधून मंजूर झाली असून लवकरच ते काम पूर्ण केले जाईल .नामदेव मोरे यांनी प्रास्ताविक केले व अण्णा भाऊ साठे यांचे कार्य कीती महान आहे या बद्दलची उदाहरणे दिली . आभार प्रदर्शन मुकेश अंभोरे यांनी केले .
या प्रसंगी अण्णा भाऊ साठे नेरी नाका गृप तर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले , डॉ. प्रमोद पाटील , डॉ. पंकज गायकवाड़ , डॉ. दीपक पाटील , सोनाली अहिरराव , वृषाली पाटील यांनी रक्त संकलन करुन प्रमाणपत्र प्रदान केले .या प्रसंगी सतीश गायकवाड , आनंद पाचोंदे , राज बोदोड़े , विक्की शेलार , मनोज सपकाळे , गणेश गायकवाड , मुन्ना पाचोंदे , राकेश पातोंडे , किसन बिरहाडे , सागर आंभोरे , जीतू गायकवाड़ आदि उपस्थित होते .

