Home Breaking News घोडाझरी तलावात बुडालेल्या चार युवकांचा मृतदेह हाती

घोडाझरी तलावात बुडालेल्या चार युवकांचा मृतदेह हाती

298

🔺नागभिड तालुक्यातील घोडाझरी तलाव येथील घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.17 जुलै):- घोडाझरी तलावात चार युवक बुडाल्याची घटना 16 जुलै 2023 रविवारला वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती. सेल्फीच्या नादात चौघांनी आपला जीव गमावला. ही माहीती कळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचला आणि बचाव पथक द्वारे 4 युवकांचे मृतदेह शोध घेणे सुरू केले. अखेर दिनांक 17 जुलै रोजी घोडाझरी तलावातुन चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दुर्दैवी घटना दिनांक 16 जुलै रोजी नागभिड तालुक्यातील घोडाझरी तलावाच्या परिसरात घडली. प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेगाव येथील मनीष श्रीराम (26), धीरज झाडें (27), संकेत मोडक (25), चेतन मांदाडे (17) हे चार युवक रविवारचा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नागभिड तालुक्यातील घोडाझरी तलाव बघण्यासाठी गेले.

ह्या ठिकाणी गेल्यानंतर युवकांना फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. आणि सेल्फी च्या नादात या चार युवकांना घोडाझरी तलावात बुडून जीव गमवावा लागला. या चार युवकांचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला आज यश आले असून पुढील कार्यवाही संबंधीत अधिकारी करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here