Home Breaking News गेवराई शहरात २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अपघात की घातपात?

गेवराई शहरात २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अपघात की घातपात?

96

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.15जुलै):-गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. गेवराई तालुक्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात 25 वर्षीय तरुणाचा काल दि.१४ जुलै रोजी संशयास्पद मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणीसाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई शहरात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील संजय नगर भागात असणाऱ्या एका लिंबाच्या झाडाखाली हा मृतदेह आढळला आहे. सचिन साहेबराव चव्हाण वय 25 रा.सुशी तांडा ता.गेवराई असे मृत तरुणाचे नाव आहे.

या घटनेची माहिती कळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घटनेची माहिती घेत पंचनामा केला. दरम्यान मयत सचिन चव्हान याचा खून झालाय की आत्महत्या केली ? याचा तपास गेवराई पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here