Home महाराष्ट्र चिमुरात शिवप्रकाश सुपर मार्टचा शुभारंभ-पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

चिमुरात शिवप्रकाश सुपर मार्टचा शुभारंभ-पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

120

✒️ सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-८६०५५९२८३०

चिमुर(दि.१३ जुलै):-ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व जीवनावश्यक वस्तु मिळव्यात या उद्देशाने आज (१३ जुलै) शिवप्रकाश सुपर मार्टचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटन होताच ग्राहकांनी विविध साहित्य खरेदीला चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला.

चिमुर येथील हजारे पेट्रोलपंप चौकात पिंपळनेरी मार्गावर शिवप्रकाश सुपर मार्टचा प्रारंभ श्रीमती सुनिता प्रकाश बंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी चिमुरातील अनेक व्यापारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवप्रकाश सुपर मार्टचे संचालक पवन बंडे यांचे नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होते.

ग्राहकांना माफक दरात व एकाच ठिकाणी जीवनावश्यक सर्व साहित्य उपलब्ध करून ग्राहकांच्या वेळेची बचत करण्याच्या उद्देशाने सुपर मार्टची सुरुवात करण्यात आली आहे. भविष्यात ग्राहकांच्या मागणीनुसार व ग्राहकांना परवडेल अशा विविध योजना राबविण्याचा मानस असल्याचे मत शिवप्रकाश सुपर मार्टचे संचालक पवन बंडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here