




✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.13जुलै):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० जुलै 2023 रोजी मुंबई विधानभवनावर गायरान राज्यव्यापी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी सातारा (पूर्व-पश्चिम) जिल्हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोर्च्यात सामील होण्याचे आवाहन वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष सनी तुपे यांनी केले
यावेळी तुपे यांनी सांगितले वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात विधानभवन मुबंई येथे गायरान राज्यव्यापी आंदोलन होणार असून त्याविरोधात विराट मोर्चाचे आयोजन करणेत आले आहे तरी सातारा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्याच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांनी आपली जमीन किती जाणार आहे ते सातबारे घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

