Home महाराष्ट्र उमरखेड महागाव विधानसभा मध्ये साहेबराव कांबळे हे आले जनतेच्या सेवेसाठी

उमरखेड महागाव विधानसभा मध्ये साहेबराव कांबळे हे आले जनतेच्या सेवेसाठी

145

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.12जुलै):- उमरखेड महागाव विधानसभा निवडणूक क्षेत्रामध्ये काँग्रेस कडून उमेदवारी मिळण्याकरिता साहेबराव कांबळे (सामाजिक कार्यकर्ते, बेलखेडकर) म्हणून आपल्या विधानसभेच्या मतदारांच्या व जनतेच्या सेवा करण्यासाठी उमरखेड महागाव विधानसभा मध्ये आले आहे.

साहेबराव कांबळे यांनी काही महिन्यांमध्येच आपल्या कामाची सुरुवात करून जनतेच्या अडीअडचणी सोडण्याकरिता समोर आले असून त्यांनी अनेक सार्वजनिक अडचणी दूर करण्याकरिता सुरुवातही केली आहे. पण त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मिळावी म्हणून कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये आपली बातमी दिली नाही किंवा स्वतःचा उदोउदो केला नाही.

अत्यंत मनमिळावू शांत स्वभावाचे, वैचारिक दृष्टिकोन ठेवणारे, अभ्यासू व्यक्तिमत्व उमरखेड व महागाव शहरामध्ये विकास कामाची यादी व रोजगार निर्मितीचे प्रकल्प तयार करून त्यावर लोकांना रोजगार उपलब्ध होईल याकरिता कंपन्या उभारण्याची त्यांची कल्पना व विचारसरणी आहे.

तसेच त्यांनी काही महिन्यां मध्येच आपले हजारो समर्थक तयार केले आहे. जर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर निश्चितच साहेबराव कांबळे हे आमदार होतील यात शंकाच नाही.

आपल्या सर्वांना माहित आहे की उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ हा मागील पंधरा वर्षापासून एससी राखीव असून एससी समाजाचे निवडून आलेल्या आमदारांनी कोणताही विकास केलेला नाही.हे सर्व सुज्ञान जनतेला माहीत आहे.अनेक भ्रष्टाचार अनेक घोटाळे या कालावधीमध्ये झालेला आपल्याला पहावयास मिळते.

पण साहेबराव कांबळे हे आपल्या मतदारसंघांमध्ये पैसा कमवायला आले नसून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचा विकास करण्याकरिता आलेले असून जनतेच्या सेवेसाठी उमरखेड शहरामध्ये स्वतःचे घर घेऊन राहायला सुद्धा आलेली आहेत.

उमरखेड शहरांमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे इतर आजी-माजी उमेदवाराची झोप उडालेली आहे. हे मात्र खरे आहे.

आज जनतेच्या मनामध्ये साहेबराव कांबळे यांनी एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा विजय निश्चितच आहे. अशी चर्चा जनतेमध्ये जोर देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here