Home Education महात्मा फुले हायस्कूल येथे शिवसेना परिवाराकडून शैक्षणिक साहित्य वाटप !..

महात्मा फुले हायस्कूल येथे शिवसेना परिवाराकडून शैक्षणिक साहित्य वाटप !..

54

🔸नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांच्या जन्मदिनानिमित्त मतदारसंघात २ लाख वह्यांचे वाटप करणार – पी.एम.पाटील सर

🔹शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना ५१ गणवेश शिवून देणार – भानुदास विसावे.

🔸गटनेते पप्पु भावे यांच्या कडुन गरजू विद्यार्थ्यांना १०० बूट देण्याचे जाहीर !…

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.6जुलै):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.डी.पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून पी एम पाटील, गटनेते पप्पू भावे, शहराध्यक्ष विलास महाजन, विजय महाजन, वाल्मीक पाटील होते. पी एम पाटील यांनी आपल्या मनोगत ५ जून गुलाबरावजी पाटील साहेबांचा जन्मदिनी मतदारसंघात दोन लाख वह्यांचे वाटप करण्याचे लक्ष आहे. शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारा पक्ष आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदासजी विसावे यांनी देखील मी याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आम्ही साहेबांसारखेच सामाजिक कार्य करत असतो आणि शाळेतील गरजू ५१ विद्यार्थ्यांना मी ड्रेस शिवून देईल असे जाहीर केले. स्व.सलीम पटेल स्व.राजेंद्र महाजन यांचा स्मरणार्थ शिवसेनेचे गटनेते पप्पु भावे यांचा कडुन गरजू विद्यार्थ्यांना १०० बूट देण्याचे जाहीर केले. यानंतर सर्व प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात वह्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी शिवसेना परिवाराचे आभार मानले. शिवसेना परिवाराच्या वतीने दरवर्षी शाळेला कपडे, बुट, वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप होते असेच प्रेम शाळेवर असू द्यावे. याप्रसंगी शिवसेनेचे तौसिफ पटेल, संभाजी कंखरे, दीपक जाधव, दिलीप पाटील, राजू महाजन, पवन महाजन, हेमंत महाजन, संजय चौधरी, पत्रकार बाळासाहेब जाधव, वसीम पिंजारी, कांतीलाल माळी, जितेश महाजन, पापाशेठ वाघरे, हेमंत चौधरी, अजय महाजन, विजय वाघ शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.टी.माळी तर आभार एस.एन.कोळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here