Home Breaking News अखेर बोरा बॅन्ड ऑनलाईन ट्रेडींग अॅप Boro Online App वर गुंतवणुकीसाठी आमिष...

अखेर बोरा बॅन्ड ऑनलाईन ट्रेडींग अॅप Boro Online App वर गुंतवणुकीसाठी आमिष दाखवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

130

🔺गुन्हयातील किशोर कुंभारे आरोपीला अटक तर दुसरा आरोपी विक्की झाडे सध्या फरार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि. 4 जुलै):-नजिकच्या काळात बोरा बॅन्ड या ऑनलाईन ट्रेडींग साईट वर पैशे गुंतवणुक केल्यास 40 दिवसांमध्ये पैशे दुप्पट होतात ही भंडारा शहरात सर्वत्र चर्चा सुरु असुन शहरातील बहुतांश युवकांनी बोरा बॅन्ड या ऑनलाईन साईटवर पैशाची गुंतवणुक केल्याचे निदर्शनास आले आहे.

काही दिवसांपासुन बोरा बॅन्ड ही ऑनलाईन ट्रेडींग साईट बंद झाली असुन गुंतवणुकदारांचे पैशे विड्रॉल होत नसल्याने भंडारा शहारात बोरा बॅन्ड ऑनलाईन साईट चा प्रचार व प्रसार करुन गुंतवणुक दारांचे पैशे दुप्पट करुन देण्याचे प्रलोभन देऊन नामे किशोर कुंभारे साई मंदिरचे मागे तकिया वार्ड भंडारा आणि विक्की झाडे रा. आंबेडकर वार्ड भंडारा यांनी गुंतवणुक दारांचे नमुद ऑनलाईन ट्रेडींग साईट वर पैशे गुंतवणुक करुन घेतले परंतु सध्या बोरा बॅन्ड ही ऑनलाईन साईट बंद झाल्याने गुंतवणुक दारांचे पैशे विड्रॉल होत नसल्याने गुंतवणुकदारांनी पैशे परत मिळणे करीता किशोर कुंभारे व विक्की झाडे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी पैशे परत मिळवुन देण्यास असमर्थता दर्शवुन गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याने फीर्यादी नामे पवनकुमार दादाराम मस्के रा. विद्यानगर भंडारा यांचे प्राप्त तक्रारीवरुन पो.स्टे भंडारा अंतर्गत अप क्र 390/2023 कलम 420,406,34 भा.द.वी सहकलम 3 महाराष्ट्र ठेवीदारांचा (वित्तीय हितसंबधाचे संरक्षण) अधिनियम 1999 अन्वये गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

प्रकरणी आरोपी नामे किशोर सुधाकर कुंभारे वय 46 वर्ष रा. साई मंदिर चे मागे तकिया वार्ड भंडारा यांस अटक करण्यात आली असुन गुन्हयातील आरोपी विक्की झाडे सध्या फरार असुन भंडारा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदरची कारवाई मा.श्री. लोहित मतानी पोलीस अधीक्षक, भंडारा,मा. श्री ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा, श्री अशोक बागुल उपविभागिय पोलीस अधिकारी भंडारा यांचे मार्गदर्शनामध्ये श्री नितीन चिंचोळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा/ प्रभारी ठाणेदार पो. स्टे भंडारा यांचे नेतृत्वात भंडारा पोलीसांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि विनोद गिरी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here