Home Education आय.टी.आय. मध्ये प्रवेशासाठी दररोज मार्गदर्शन सत्र

आय.टी.आय. मध्ये प्रवेशासाठी दररोज मार्गदर्शन सत्र

69

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.4जुलै):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे प्रवेश घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी दररोज कार्यालयीन वेळेत मार्गदर्शन होत असते तसेच दररोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत एकत्रित विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित केले जाते .

प्रवेश अर्ज कसा भरावा, प्रत्येक व्यवसायाचे महत्त्व, रोजगार संधी, व्यवसाय निहाय जागा भविष्यातील शिक्षण या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी केलेली आहे.

जेणेकरून इच्छुक उमेदवार व पालकांना योग्य माहिती मिळेल. तसेच संस्थेच्या आवारात लावलेली शैक्षणिक करिअर चित्रप्रदर्शनीचा लाभ घेता येईल. करिता जिल्ह्यातील विद्यार्थी पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here