Home महाराष्ट्र तिजारे कृषी केंद्राचा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल -प्रा. अतुल भाऊ देशकर

तिजारे कृषी केंद्राचा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल -प्रा. अतुल भाऊ देशकर

143

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.19 जून):-काल दिनांक 18 जून रोजी तळोदी (खुर्द) येथे तळोधीचे तडफदार सरपंच तथा भाजपाचे नेते अनिल तिजारे यांच्या “तिजारे कृषी केंद्राचे ” उद्घाटन आणि वास्तुपूजन कार्यक्रमाला ब्रह्मपुरी विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय प्रा.अतुल भाऊ देशकर यांनी उपस्थिती दर्शवली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुणजी शेंडे, भाजपा ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष प्रा. डॉ.अशोक सालोटकर,माजी सभापती तथा भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलाल महादेव दोनाडकर, भाजपा आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, माजी उपसरपंच तथा अनुसूचित जाती आघाडीचे चुमदेवजी जांभुळकर, मुईचे सरपंच तथा भाजपा कामगार आघाडीचे महामंत्री उमेश घुले, उपसरपंच देवरावजी ननावरे, भाजपा ज्येष्ठ नेते तथा सेवा सहकारी सोसायटी तळोधीचे उपाध्यक्ष भाऊराव ठवकर,शेंडे बाबूसाहेब गांगलवाडी इ. मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

आपला परिसर हा कृषी प्रधान परिसर आहे त्यामुळे कृषी विषयक घटक जसे खते, रासायनिक औषधी द्रव्ये, कीटकनाशके यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तिजारे कृषी केंद्राचा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल. असा आशावाद भाऊंनी व्यक्त केला.अनिल तिजारे यांनी उपस्थित अतिथी गणांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here