सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)
खटाव(दि.18जून):-पांगारखेल ता. खटाव जिल्हा सातारा,येथील ओयासीस अल्कोहोल कंपनीचे आवारातुन उभी असलेली ट्रॉली किंमत रुपये १ लाख व १७ पत्र्याची पाने किंमत रुपये ३४ हजार ची चोरीस गेलेबाबत चोरीचा गुन्हा दाखल झाला.
गुन्हा उघडकीस आणण्याच्या दष्टीने पोलीस ठाणेचे डी.बी.पथक, व गोपनीय माहिती क्या आधारे डिस्कळ ता. खटाव मंगेश नलवडे रा. डिस्कळ या संशयीताची माहिती मिळाली माहितीचे आधारे तात्काळ पुसेगाव मी पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
लागलीच त्याचेकडुन गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर व चोरीस गेला माल असा एकुण किंमत रुपये ७ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून. अधिक तपास सहा फौजदार चंद्रहार खाडे करीत आहेत.
मा.श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक तसेच श्री. राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक, सफौ. सुधाकर भोसले, चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार दिपक बर्गे, पोलीस नाईक अशोक सरक सचिन जगताप, उमेश देशमुख, हणमंत सुतार, तुषार बाबर यांनी सदरची कारवाई केली असुन सदर कारवाईत सहभागी अधिकारी, अंमलदार यांचे मा. श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
