




✒️सातारा/ खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
खटाव(दि.18जून):-आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करित वैष्णवाचा मेळा विठ्ठलाला भेटण्यासाठी निघाला आहे.आज हा वैष्णवांचा मेळा रविवारी संध्याकाळी साडेचार च्या सुमारास नीरा स्नान करून लोणंद नगरीत दाखल झाला. लोणंद नगरपंचायतीच्या व ग्रामस्थांच्यावतीने पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पाडेगाव ते लोणंद ६ कि मी अंतर सुमारे अडीच तासात पार करुन पालखी सोहळ्याने दुपारी साडेचार च्या सुमारास लोणंद गावात प्रवेश केल्यानंतर नगरपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्यावर पुष्प उधळून स्वागत करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा मधुमती गालिंदे शिवाजीराव शेळके , मुख्याधिकारी दतात्रय गायकवाड नगसेवक गणीभाई कच्छी तृप्ती घाडगे दिपाली शेळके ज्योती डोनीकर राजश्री शेळके सीमा खरात सुप्रिया शेळके दिपाली निलेश शेळके आसिया बागवान असगर इनामदार रविंद्र क्षीरसागर शंकर शेळके बाळासो भिसे सुनिल यादव आदि नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.
माऊलींच्या सोहळ्याच्या स्वागतानंतर पालखी सोहळा स्टेशन चौक लक्ष्मी रोड मार्गे तानाजी चौकात आल्यानंतर रथातून माऊलींची पालखी बाहेर काढून ग्रामस्थांनी पालखी खांदयावर घेऊन विठ्ठल मंदिर भवानी माता मंदीर मार्गे बाजार तळावरील पालखी तळावर ठेवण्यात आली माऊलीची पालखी गावातून जात असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती पालखी पाचच्या सुमारास पालखी तळावर आल्यानंतर सुमारे ५ते १०मिनिट पालखी खांद्यावर घेऊन नाचवली त्यानंतर पालखीला पालखी तळाच्या मध्यभागी ठेवण्यात आले त्यावेळी दिंडीतील वारकरी गोलाकार होऊन ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजर करत होते सव्वा पाच च्या सुमारास चोपदारांनी राजदंड उंचावताच सर्वत्र एकच शांतता झाली यावेळी दिंडी व वारकऱ्यांना सुचना देण्यात आल्या नंतर माऊलींची पालखी तळावर ठेवण्यात आली.

