धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर
धरणगांव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळी खुर्द येथे शाळापूर्व तयारी मेळावा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम नवागतांची ट्रॅक्टर मधून गावातून मिरवणूक काढण्यात आली.नवागतांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न झाला. यात नवीन दाखल विद्यार्थ्यांच्या क्षमता पडताळून पाहण्यात आल्या. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी श्री.नरेंद्र चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आजम दादा सदस्य सुरेश गुंजाळ, विनायक पाटील, सिताराम पाटील, माधुरी ढमाले, समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील सदस्य सुनिल महाले,कल्पना मराठे, संगीता खैरनार, गोपाल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक संजय गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका रजनी सुरमारे, संजय गायकवाड व वैशाली वाणी यांनी परिश्रम घेतले.
