




🔸भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे सर यांचे हस्ते पक्षामध्ये प्रवेश
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.15 जून) :- भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी तर्फे जनसंपर्क अभियानांतर्गत मुडझा येथे प्रमुख पदाधिकारी तथा पक्ष कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 14 जून ला संपन्न झाली. या बैठकीला भाजपाचे तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे सर होते, विशेष उपस्थिती भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर , सोशल मिडिया प्रमुख तथा महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका इंजिनियर अविनाश मस्के,भाजपा वरीष्ठ नेते साकेतजी भानारकर , भाजयुमो जिल्हा सदस्य लीलाधर राऊत जेष्ठ नेते झरकर सर,बूथ प्रमुख अरुणभाऊ झंझाड, उपसरपंच लोमेश राऊत, ग्रा. पं. सदस्य मोतीराम मेश्राम, ग्रा. पं. सदस्य. बंडूभाऊ कोटगले ,दिवाकर बोबाटे, ई. मान्यवर उस्थितीत होते.
यावेळी मुडझा येथील युवा नेते अनंत बर्वे यांनी पक्षात प्रवेश केला. तालुकाध्यक्ष अरुण शेंडे सर यांनी भाजपचा दुपट्टा त्यांच्या खांद्यावर घालून पक्षप्रवेश करून घेतल्याची जाहीर केले. प्रा. अतुल भाऊ देशकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश करीत असल्याचे श्री अनंत बर्वे यांनी जाहीर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेता शुभमभाऊ तोमठी , संचालन मुडझा शाखा भाजयुमो अध्यक्ष मुकेश झंझाड , तर आभार मोतीराम मेश्राम यांनी मानले, यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवा उपस्थित होते.

