सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड:- (दि. 5 जून) तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम पळशी गावाजवळ उमरखेड- पुसद रोडवरील पुला जवळ अंदाजे दहा ते साडे दहा च्या दरम्यान नांदेड येथून गोदीया जाणारी बस MH 40 Y 5816 उमरखेड ते पुसद मार्ग जात असताना पळशी गावाजवळ पुलाचे काम चालू असताना सदर बस ही पुलावरून खाली उतरता उतरता व पलटी होता होता थांबली गाडीत बसलेले 20 ते 30 प्रवाशचे प्राण वाचले अन्यथा फार मोठी दुर्घटना होता होता टळली.
रस्त्यावर कोणतेही सूचना फलक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आल्याचे दिसत नसून सूचनाफलक नसल्यामुळे अपघात होऊन लोकांचे प्राण गेले असते तर या गंभीर बाबीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वीकारल्या जात होती काय ?हा प्रश्न यानिमित्ताने सर्वसामान्यातून उपस्थित होत आहे पावसाळी दिवस तोंडावर येऊन ठेपले असले तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम जलद गतीने करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलल्या जात नसल्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना अतिशय अवघड व जोखमीचे होऊन बसले आहे.
लोकप्रतिनिधींनी देखील या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असताना लोकप्रतिनिधी देखील या बाबीकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे मागील दोन वर्षा अगोदर याच रोडवर दहागाव नाल्यावर बस पाण्यात वाहून गेली होती तशी पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये.
यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे एकीकडे शासन रस्ते विकासावर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे व कंत्राटदाराच्या मनमानीमुळे अशा रस्ता अपघाताच्या घटनात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे.




