



प्रतिनिधी – प्रमोद पाटील
पातोंडा ता.चाळीसगाव येथे प्रथमच सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीनुसार दशक्रीया व उत्तरकार्य संपन्न झाला. ह.भ.प. भगवान पांडुरंग जाधव ( माजी गुरूजी) यांच्या पत्नी आणि सत्यशोधक कैलास व विलास भगवान जाधव यांच्या मातोश्री सौ. वंदनाआई भगवान जाधव उर्फ बायजाआई यांचा पंचतत्वाचा देह दि. १६/५/२०२३ रोजी रात्री ११ वा. पंचतत्वात (निसर्गात) विलीन दुसर्या दिवसी दुपारी ११ वा. त्यांच्यावर पातोंडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. तीस-या दिवसी या आईच्या अस्थी/रक्षा परंपरेनुसार पाण्यात न टाकता आपल्या शेतात खड्डे करून त्यात दहा वृक्ष लागवड करण्यात आले. सौ. वंदनाआई चा दशक्रीया उत्तरकार्य गंधमुक्तचा कार्यक्रम सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीनुसार रविवार दि. २८/५/२०२३ रोजी सकाळी १० वा.माळी समाज मंगलकार्यालय भडगाव रोड पातोंडा येथे प्रथमच संपन्न. या प्रसंगी आलेल्या सर्व उपस्थित अतिथी गणांना महापुरुषांचे चरित्र जाधव परिवाराच्या वतीने भेट देण्यात आले. सुरुवातीलाच “शिवक्रांती बुक स्टॉल” चा पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला होता. कार्यक्रमाला येणाऱ्या अतिथींनी वैचारिक पुस्तकांची मोठीच खरेदी केली. सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार यांनी अतिशय सुंदर सत्यशोधकीय प्रबोधन करून वास्तव जनतेसमोर आणले. नंतर सर्व विधी सार्वजनिक सर्वधर्मीय पद्धतीने करण्यात आले. त्यानंतर बायजाआई चे मुलं मुली पुतणे यांनी उभयतां समोर शपत घेतली अशी, आम्ही सर्व भावंडे एकमेकांशी संपत्तीसाठी न भांडता प्रमाणे राहू आई चे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लहान मुलांचे शिक्षण करून त्यांना सांभाळू मृतांच्या नावाने कुठलेही अंधश्रद्धा कर्मकांड करणार नाही आणि त्यांच्या नावाने दरवर्षी दहा देशी वृक्षांची लागवड करू. अशी निर्मीकास व कुलस्वामिनीस स्मरून शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सत्यशोधक समाजाची सामुहिक प्रार्थना घेऊन समारोप करण्यात आला. हा सर्व विधी सत्यशोधक समाज संघ पुरस्कृत विधीकर्ते भगवान शा. रोकडे यांनी केला. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते साळूबा पांडव, शिवदास महाजन, जिल्हा समन्वय विजय लुल्हे, प्रमोद पाटील, कविराज पाटील उपस्थित होते. पातोंडा येथील सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीनुसार पहिलेच उत्तरकार्य असल्याने हजारोंच्या संख्येत आप्तेष्ट नातेवाईक स्नेहीजन समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते.


