अनिल साळवे, प्रतिनिधी
गंगाखेड : शहरातील नाथजोगी भटक्या जमातीसाठी स्मशाभूमीसाठी स्वतंत्र जागा प्राप्त झाली आहे. ही मागणी पुर्ण करून घेण्यासाठी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, समाजाचे नेते भाऊराव बाबर यांचेसह समाजाच्या कार्यकर्त्यांनी सतत तीन वर्षे पाठपुरावा केला. मागणीस यश आल्यानंतर आज गंगाखेड तहसीलदारांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गंगाखेड शहरातल्या दत्तमंदिर आणि ईतर भागात नाथजोगींसह विविध भटक्या जमातींचे नागरिक वस्ती करून राहत आहेत. यातील बऱ्याच जणांनी भूखंड घेवून स्वतःची अधिकृत घरे बांधली आहेत. तर अनेकजण अजूनही पालांमध्ये वास्तव्यास आहेत. या नागरिकांतील कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या दफनविधीसाठी हक्काची जागा ऊपलब्ध नव्हती. परिणामी गोदाकाठावरील अडचणीच्या जागेत हे विधी करावे लागत होते. यावरून अनकेदा वादाचे प्रसंगही निर्माण होत होते.
ही बाब भटके विमुक्त नाथजोगी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊराव बाबर यांनी कॉग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्या निदर्शनास आणून देत स्मशानभूमीसाठी जागा मिळवून देण्याची विनंती केली होती. यावरून गोविंद यादव व नाथजोगी समाजातील पदाधिकाऱ्यांनी गंगाखेडचे तत्कालीन नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांचेकडे जागेची मागणी केली होती. सततच्या पाठपुराव्यानंतर तहसीलदार श्री गोविंद येरमे यांच्या कार्यकाळात जागा ऊपलब्ध करून देण्यात आली. तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून जागेचा ताबाही नुकताच देण्यात आला आहे.
यामुळे नाथजोगी भटक्या समाजाकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून भटक्यांची मरणोप्रांत भटकंती थांबली असल्याची भावना भटके विमुक्त नाथजोगी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊराव बाबर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तहसील प्रशासनाने जागा ऊपलब्ध करून दिल्याबद्दल आज दि. ३० मे रोजी तहसीलदार रंजीतसींह कोळेकर यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोविंद यादव, भाऊराव बाबर, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, रामेश्वर भोळे, तालुकाध्यक्ष राम शितोळे, राजेश सोळंके, रमेश सावंत, साजन शिंदे, सुरेश शिंदे, सुनिल शिंदे, ज्ञानेश्वर सावंत, सागर शिंदे, संजय सनिसे, रोशन सोळंके, मोहन सावंत, ईश्वर सनिसे, गणेश शिंदे, सुभाष शितोळे, भीमराव शिंदे आदिंची ऊपस्थिती होती.
*आता विकासासाठी पाठपुरावा – गोविंद यादव*
गंगाखेडच्या भटक्या समाजास तीन वर्षांच्या सलग पाठपुराव्यानंतर स्मशाभूमीसाठी हक्काची जागा मिळाली आहे. ही समाधानाची बाब असली तरी आता तेथे सर्व सुविधा ऊपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आहे. या सुविधा ऊपलब्ध करून घेण्यासाठी शासन-प्रशासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा केला जाणार असल्याचे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी सांगीतले आहे.