अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी )परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त १ जून रोजी गंगाखेड शहरात अभिष्टचिंतन सोहळ्यासह महाराष्ट्राचे प्रख्यात कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील श्रीराम चौक येथे १ जून रोजी संध्याकाळी ८:३० वाजता खा.संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनासह भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन होत आहे. या सोहळ्यात शिवसेनेच्या वतीने खा.जाधव यांचा भव्य सत्कारही होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम हे असणार आहेत. या अभिष्टचिंतन व भव्य कीर्तन सोहळ्यास गंगाखेड शहर, तालुका व पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच वारकरी संप्रदायातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचेसह माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, उपजिल्हाप्रमुख ॲड.मनोज काकाणी, तालुकाप्रमुख अनिल सातपुते, शहरप्रमुख जितेश गोरे, शहर संघटक ॲड. राजू देशमुख कांदलगावकर, उप तालुकाप्रमुख धोंडीराम जाधव, रामकिशन शिंदे, मारुती आडे, महिला जिल्हा संघटिका सखुबाई लटपटे, तालुका संघटिका भारतीबाई सोन्नर, उपजिल्हा संघटिका सुनिता घाटगे, युवासेना तालुका अधिकारी कुंडलिक भडके, मंगेश भिसे, युवासेना शहर संघटक गोविंद जाधव, उप शहरप्रमुख अमोल खटिंग, नागेश कोनार्डे, माजी नगरसेवक गोविंद अय्या, माजी पंचायत समिती सदस्य भास्कर काळे, प्रमोद साळवे आदींनी केले आहे.
