



बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो.78751 57855
पुसद- तालुक्यातील ग्रामपंचायत मांडवा येथे नवतरुण युवक, विद्यार्थ्याकरिता गावामध्ये व्यायाम शाळा तसेच, व ग्रंथालय या वास्तूसाठी जागेची उपलब्धता करून द्यावी याकरिता ग्रामपंचायत कार्यालय मांडवा यांना गावातील ग्राम परिवर्तन समिती यांच्यावतीने दिनांक 23 मे 2023 रोजी निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की आजच्या तांत्रिक युगामध्ये नवतरुण विद्यार्थी युवक हे मोबाईल व्हाट्सअप ,फेसबुकच्या आहारी गेलेले आहेत .त्यामुळे या सर्वांना
शारीरिकदृष्ट्या सक्षम व तंदुरुस्त राहणे अत्यंत आवश्यक असून याकरिता गाव स्तरावर व्यायाम शाळेची अत्यंत आवश्यकता आहे. त्याकरिता लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे .असलेले साहित्य सोसायटीच्या गोदाम येथे धुळखात पडले आहे. लाखो रुपयाच्या या साहित्याची
देखभाल व वापर होण्याकरिता
परंतु जागे अभावी उपलब्धता नसल्याने व्यायाम शाळेचा प्रश्न अनुत्तरीत आहे.
तेव्हा ग्रामस्थारावर व्यायाम शाळे करिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
तसेच बौद्धिकदृष्ट्या आजच्या तांत्रिक युगात मोबाईल संस्कृतीमुळे वाचन संस्कृती लोप पावल्यामुळे गावात सुसंस्कृत नवयुगाची पिढी निर्माण व्हावी वाईट अवस्था व्यसनाधीन मार्गाकडे ती वळू नये याकरिता गाव स्तरावर वाचनालयाचे अत्यंत आवश्यकता आहे तेव्हा ग्रामपंचायत कार्यालयाने व्यायाम शाळा व वाचनालया करिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी याकरिताचे निवेदन विनंती अर्जाद्वारे ग्रामपंचायत कार्यालय मांडवा यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर पोलीस पाटील दत्तराव पुलाते,तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, महादेव डोळस,कैलास साखरे,ग्राम परिवर्तन समिती अध्यक्ष बजरंग पुलाते,उपाध्यक्ष समाधान आबाळे, कैलास राठोड,हरिभाऊ धाड,आदी ग्रामस्थाच्या तसेच ग्राम परिर्वतन समितीच्या पदाधिकारी मंडळी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हे निवेदन ग्राम परिवर्तन समितीचे अध्यक्ष बजरंग पुलाते व उपाध्यक्ष समाधान आबाळे यांनी सरपंच अल्का ढोले, उपसरपंच विजय राठोड, ग्रामसेवक एस.टी.तडसे, समस्त ग्रा.प. सदस्याच्या उपस्थित देण्यात आले.


