Home चंद्रपूर प. पूज्य गीताचार्य तुकाराम दादांची पुण्यतिथी ही तिथीनुसार साजरी – पुण्यतिथी उत्सव...

प. पूज्य गीताचार्य तुकाराम दादांची पुण्यतिथी ही तिथीनुसार साजरी – पुण्यतिथी उत्सव समिती अड्याळ टेकडी

140

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी(दि. 25 मे ):-
निष्काम कर्मयोगी ब्रह्मलीन प.पू. तुकाराम दादा गीताचार्य यांची तिथीप्रमाणे पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशी दिनांक 01/06/2023 रोज गुरुवार ला होणार असे पुण्यतिथी उत्सव समिती अड्याळ टेकडी यांच्या कडून कळविण्यात आले.
निष्काम कर्मयोगी ब्रह्मलीन परमपूज्य तुकारामजी दादा गीताचार्य हे कर्मयोगी संत होते. संतांची पुण्यतिथी ही तिथी प्रमाणे होत असल्याने पूज्य दादांची पुण्यतिथी सुध्दा ही तिथीनुसार म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी दिनांक 01/06/2023 रोज गुरुवार ला मौन श्रद्धांजली अर्पण करून साजरी करण्यात येईल असे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम, मोझरी संचालित श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भू-वैकुंठ अड्याळ टेकडी चे अध्यक्ष मोरेश्वर उईके यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
दिनांक 31 मे व 1 जुन, 2023 पर्यंत दोन दिवसीय चालणाऱ्या पुण्यतिथी उत्सवामध्ये गुरुपद गुंफा, पूज्य गीताचार्य दादांची समाधी आणि दादांच्या आसन स्थानाची फुलांनी सजावट, भजन, किर्तन, रामधुन, सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, श्रमदान, संकल्प, अध्यात्म गुरुकुल, ग्रामगीता दर्शन मंदिर व इतर आश्रमातील कार्यवृत्त अहवाल, महिलांचे आर्थिक सक्ष्मीकरणाच्या दृष्टीने कलाकुंज बहुुद्देशिय महिला प्रशिक्षण संस्था यवतमाळ व आत्मानुसंधान भुवैकुंठ टेकडी यांचे सयुक्त विद्यमाने शिलाई मशीन चे वितरण, टेकडी परिसरातिल दीडशे एकर जमिनीवर विविध प्रकारच्या जातीचे वृक्षारोपण तसेच पुढील कार्याचे नियोजन, पाहुण्यांचे श्रद्धांजलीपर मार्गदर्शन व महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित केले आहे.
पुण्यतिथीला मा. पालक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटिवार तथा उपाध्यक्ष, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम, मोझरी, मा. बंटीभाऊ भांगडिया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र तथा संचालक अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी, डॉ. सतीश वारजूरकर, ह.भ.प. गवते महाराज, मा. नाना महाराज परसवाडा, भुरे महाराज, मा. विठ्ठलराव पंचभाई येनोडा, डॉ. रमेश येळणे अध्यक्ष ग्रामगिता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर, जिल्हा कृषी अधिकारी मा. भाऊसाहेब बऱ्हाटे, दुर्गाताई पटले यवतमाळ, सौ. ताराबाई गाडेकर सरपंच, नामदेवराव लांजेवार उपसरपंच ग्रामपंचायत अड्याळ (जाणी), सौ. निशा मडावी सरपंच ग्रामपंचायत चोरटी,
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी मा. लक्ष्मणजी गमे, दामोधरजी पाटील उपसर्वाधिकारी, सचिव मा. जनार्दन पंत बोथे, आत्मानुसंधान भुवैकुंठ अड्याळ टेकडी चे मार्गदर्शक मा. मधुकर तुंडुलवार गुरुजी, मा. मधुकर महाकोडे गुरुजी, मा. सयाम गुरुजी, सचिव मा. विलासराव सावरकर, नामदेवराव ठाकूर ब्रम्हपुरी, ग्रामगीता तत्वज्ञान दर्शन मंदिर पंढरपूर चे सचिव मा. नथुजी भुते गुरुजी उमरी, प्रचार प्रमुख मा. प्रकाश महाराज वाघ, मा. अशोक चरडे गुरुजी नागपूर, नामदेवराव ठाकूर ब्रम्हपुरी हे उपस्थित राहणार आहेत.
या अनुषंगाने पुण्यतिथी महोत्सव समिती गठीत करण्यात आली असून रमेश मेश्राम, कैलास सोनुले, विजय भोयर, रवींद्र उरकुडे, तेजराम बगमारे, मच्छिन्द्र चनोडे, गुरुदेव नागापुरे, तुळशीदास कुळमेथे, अरुण पेंदाम, दयाराम कन्नाके, साईदास सराटे, सुरेश मडावी, माणिकराव मेश्राम, वैभव कुसनाके, आशिष सिंग, सारंग दाभेकर सदस्य असून समितीचे अध्यक्ष म्हणून मा. मेश्राम सुरबोडी, यांची निवड करण्यात आली.
पूज्य तुकाराम दादांच्या कार्यावर आणी दादांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी पुण्यतिथी महोत्सवाला तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आव्हान पुण्यतिथी उत्सव समिती आत्मानुसंधान भुवैकुंठ अड्याळ टेकडी ने केले आहे.
अशी माहिती समिती अध्यक्ष रमेशजी मेश्राम सुरबोडी यांनी अड्याळ टेकडी येथिल पत्रकार परिषदेमध्ये दिली. पत्रकार परिषदेला सर्वस्वी समर्पित सदस्य सारंग दाभेकर, दयारामजी कन्नाके पारडी, यशवंत निकुरे नागभीड तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय मानव अधिकार संघटना नवेगाव (पांडव), डार्वीन कोब्रा संस्थापक अध्यक्ष भारतीय क्रांतिकारी संघटना नागभीड, संतोष भांडारकर बजरंग दल ब्रम्हपुरी, आशिष सिंग राजपूत ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष राष्ट्रीय मानव अधिकार संघटना, रवींद्र उरकुडे, विजय भोयर, गिरीधर अलबनकर सदस्य ग्राम पं. अड्याळ जाणी, रमेश मेश्राम सुरबोडी, देवागुरु, वैभव कुसनाके चोरटी, सुरेश मडावी तुकूम, बारुताई ढोंगे टेकडी अड्याळ, सौ. जनाबाई जांभुळे काटली चक, गजानन ठाकरे वाघेडा , कैलास सोनुले नवेगाव हुंडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here