



बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114
बीड जिल्हा पाेलीस दलातील कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झालाय. ही घटना पाटोदा पोलीस ठाणे येथून समोर आली आहे. पाटोदा पोलीस ठाणे येथे युवराज दामोदर राऊत राहणार नाळवंडी हे कार्यरत हाेते. युवराज हे आज (मंगळवार) सकाळी ड्युटीवर होते. काही वेळाने युवराज यांच्या छातीत दुखायला लागले. त्यावेळी त्यांना तातडीने उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात नेण्यात आले.
युवराज राऊत यांनी बीड येथे घेऊन जात असतांना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने 35 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याची बातमी समजताच संपुर्ण पाेलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


