Home चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्याची हीच नामी संधी-प्रा.अतुल...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्याची हीच नामी संधी-प्रा.अतुल देशकर

91

ब्रम्हपूरी(दि.24 एप्रिल):-
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या 28 एप्रिल 2023 ला रोज शुक्रवारला होऊ घातली आहे. या अनुषंगाने शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारात गांगलवाडी येथे मतदारांची सभा माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मा. दिपक भाऊ उराडे, वासूभाऊ सौंदरकर,प्रा.प्रकाश बगमारे, प्राचार्य अरुण शेंडे, डॉ.प्रा. अशोक सालोटकर, डॉ. गोकुल बालपांडे, एड. संजय ठाकरे, संजय बगमारे, रामलाल दोनाडकर, तनय देशकर यांचे सह शेतकरी परिवर्तन पैनलचे सर्व उमेदवार तसेच मतदार बांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मतदारांनी जागृत होऊन शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराच्या नावासमोर कप बशी या चिन्हावर रबरी फुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष स्थानावरून संबोधित करताना माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर म्हणाले की, खूप झाली यांची मक्तेदारी, आता शेतकरीराजा जागा झाला आहे. चांगल्या वाईटाची परीक्षा करण्याची धमक मतदारांमध्ये आहे.प्रस्तापीत अशा भ्रमात आहेत की, कृषी उत्पन्न बाजार समिती आमचे कुरण आहे.आम्ही कितीही चरलो तरी आम्हचे कोणी काहीही बिघडू शकत नाही. आता यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.
कार्यक्रमाची प्रास्ताविक आणि संचालन रामलाल दोनाडकर यांनी केले तर आभार प्रा.यशवंत आंबोरकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here