Home धरनगाव एस जे इन्स्टिट्यूट कडून उपक्रमशिल शिक्षक सुधाकर मोरे यांचा सत्कार

एस जे इन्स्टिट्यूट कडून उपक्रमशिल शिक्षक सुधाकर मोरे यांचा सत्कार

69

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव – तालुक्यातील साळवे हायस्कूलचे उपक्रम शिक्षक श्री सुधाकर मोरेसर यांचा आज एस जे इन्स्टिट्यूट कडून सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री मोरेसरांनी आपल्या आईच्या मृत्यूनंतर आईचे पार्थिव शरीर गोदावरी मेडीकल काँलेजला देहदान दिले ईतकेच नव्हे तर त्यांनी दशक्रिया विधीच्या दिवशी पितरणीं बघिणींच्या हस्ते दहा झाडाचे रोपे लावले, वाढवण्याचा संकल्प केला आहे आणि ईतिहासातील दहा महामातांचे आत्मचरित्रपर ग्रंथ भेट दिले. निसर्ग व पर्यावरण प्रेमी सुधाकर मोरे सर यांनी या संकल्पनेतून समाजात एक नवीन उपक्रम, योजना वापरून खरोखरच कौतुकास्पद कार्य केले म्हणून अशा समाजोपयोगी शिक्षकाला मानाचा मुजरा करून गौरवण्यात आले.
सदर सत्कार प्रसंगी एस जे इन्स्टिट्यूट व स्वप्न साकार फाउंडेशन च्या संचालिका भारती काळे मॅडम, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे उपराज्याध्यक्षा मनीषा पाटील मॅडम, सरस्वती विद्यामंदिर शाळेचे उपक्रमशिल शिक्षक सुदर्शन पाटील सर जळगाव शहर कोचिंग क्लासेस असोसिएशनचे शहराध्यक्ष योगेश चौधरी तसेच स्वामी समर्थ केंद्रप्रमुख व निसर्ग पर्यावरण प्रेमी वसंत पाटील सर,नितीन पवार (धरणगाव) व जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले सर,हर्षाली पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार व गौरवकरून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सूत्रसंचालन व आभार वसंत पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here