Home बीड सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहा-विवेक...

सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहा-विवेक कुचेकर

93

नवनाथ आडे,बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड -कुळवाडी भुषण राजाधिराज बहुजन प्रतिपालक छञपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक संयुक्त जयंतीनिमित्त बीड तालुक्यातील चौसाळा येथे राष्ट्रीय सप्तखंजिरी वादक समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते विवेक कुचेकर यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या थोर क्रांतीकारी सर्वसमावेशक व्यक्तीमत्तवाचे शौर्य प्रबोधनाच्या नजराणा हा महाराष्ट्राच्या जनतेला उर्जा प्रेरणादायी पर्वणी असते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रथमच चौसाळा शहरात महामानवाच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सप्तखंजिरी वादक राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी गोरे इंग्लिश स्कूल मैदानात करण्यात आले आहे .
या कार्यक्रमासाठी उदघाटक बीड विधानसभेचे लोकप्रिय आमदार संदीप (भैय्या)क्षीरसागर हे असुन प्रमुख उपस्थिती म्हणून समाजरत्न पुरस्कार प्राप्त लोकनेते डॉ.बाबु जोगदंड साहेब हे उपस्थित राहणार आहेत .
तरी बीड तालुक्यातील सर्व नागरिक ,महिला,युवक पदाधिकारी पञकार बाधंव व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष विवेक (बाबा ) कुचेकर यांच्यासह संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here