Home महाराष्ट्र प्रतिक्षा विलास बरडे हिची नांदेड पोलीस मध्ये निवड

प्रतिक्षा विलास बरडे हिची नांदेड पोलीस मध्ये निवड

104

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 17 एप्रिल)
दृढनिश्चय, अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम करण्याची जिद्द व चिकाटी असलेल्या व्यक्तीला यश हमखास मिळते याचे जिवंत उदाहरण म्हणजे उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील प्रतिक्षा हीची नांदेड पोलीस मध्ये निवड झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेतकऱ्याची मुलगी म्हटल्यावर घरची परिस्थिती अगदी जेमतेम मात्र या परिस्थितीवर मात करून आत्मविश्वासाने अभ्यास व सराव करून तिने नादेड पोलीस मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा आई-वडील, भाऊ यांनी तिला प्रोत्साहन दिले व ते आत्मविस्वासाने सार्थकी लावल्याचे चित्र तिने जगासमोर ठेवले आहे. चूल आणि मूल या चाकोरीत देशातील अनेक महिला समाधान शोधत होत्या.

मात्र सावित्रीबाई फुले यांनी महिलासाठी सुरू केलेल्या शिक्षणाचा प्रभाव आत्ता आधुनिक मुलींमध्ये दिसून येत आहे.

अशी ही जिजाऊ व सावित्रीची लेक गावात पोलीस रुबाबात आल्यानंतर गावकऱ्यांना सुद्धा त्याचा सार्थ अभिमान वाटेल यात शंका नाही.
सद्यस्थितीत ती येथे महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिने तिच्या यशाचे श्रेय आई, वडील, बंधू, गावकरी, आजी आजोबा व प्राध्यापक वृंद यांना दिले आहे.

प्रतिक्षा हीची नांदेड पोलीस मध्ये निवड झाल्याने संपुर्ण परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरातील पोलीस भर्तीची तयारी करणाऱ्या मुलीसाठी ती एक आदर्श बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here