गंगाखेड (प्रतिनिधी )सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कामामुळे च आज बहुजन समाज जागृत झाला आहे असे मत गंगाखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेभाऊ ( आण्णा ) गायकवाड यांनी मत व्यक्त केले.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे आयोजन शहरातील मातोश्री रमाबाई नगर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेभाऊ आण्णा गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून पिराजी कांबळे, प्रसेन्नजित मस्के,सय्यद बिलाल भाई, दामोदर जोंधळे, विशाल मस्के, अरविंद गाडे, जितेंद्र इचके,सोनू गायकवाड, रविंद्र गायकवाड,संजय व्हावळे,दसरत तायडे, सटवाजी रायभोळे आदी उपस्थित होते. यावेळी महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
