
प्रथमतः कविवर्य मा. नवनाथ रणखांबे यांचं अभिनंदन करतो आणि आभार हि व्यक्त करतो. त्यांनी इतक छान अस अनमोल मोती ‘प्रेम उठाव’ हे पुस्तक आमच्या सारख्या वाचकांच्या ओंजळीत टाकलं ! ह्या पुस्तकातील एक – एक कविता त्यातील प्रत्येक शब्द जिवंत असल्याची जाणीव करून जाते. अफाट प्रेमाने भरलेलं अंतःकरण आणि प्रेम उठाव कवितेतून दिसणारा एक क्रांतिसूर्य तुमचा माझा बाप ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे प्रखर पणे जाणवत आहेत. आंबेडरी विचार धारा हा नवनाथ रणखांबे यांच्या कवितेचा गाभा आहे. समतेचा वसा घेतलेला का कवी समतेचा पुरस्कर्ता आहे . सामजिक बांधिलकी जपत हा कवी नवं प्रेमींना, प्रेमाची परिभाषा काय आहे ? हे ही ह्या पुस्तकातून सांगून जातो आहे. कवी प्रेम या काव्यातून सांगतो, —
‘ प्रेम संपले की,
नाते तुटते !
प्रेम टिकले की ,
नाते जुळते !’
(प्रेम उठाव / पान नंबर 59)
आणि हे खरे ही आहे. जिथे खर प्रेम असत तिथे नात ही चिरकाल टिकत पण जिथे प्रेम नसते ते नाते प्रेम टिकतच नाही. ते तुटतेच आणि मन तुटले की कवी सांगतो.
“दुःखाचा समुद्र
डोळ्यांत दाटल्यावर
टपटपतात टपोरे थेंब
कविता होऊन कागदावर ”
( प्रेम उठाव/ पान नंबर 47)
प्रेम भंग झालं की नेमकं काय अवस्था होते ? हे प्रेम वीरांचे दुःख कवी नवं युवकांस ‘ थेंब ‘ या कवितेतून सांगतो म्हणून कवी प्रेम उठाव करण्यास सांगतो. आपल्या उठाव या कवितेतून कवी समतेचा उठाव करावयास सांगतो, कवी विषमतेच्या विरोधात उठाव करावयास सांगतो, कवी माणसातील माणुसकी जागृत करण्याचा उठाव करावयास सांगतो आणि कवी नात्यातील दुरावे दूर करण्यासाठी उठाव करावयास सांगतो.
सांगायचं म्हटलं तर कवीने पुस्तकाला ‘ प्रेम उठाव ‘ हे नाव देऊन ते नाव सार्थक केलं आहे असे वाटतं. अन्यायांच्या मनुविरोधात दंड थोपवून जसा एखादा समतावादी उभा ठाकतो तसा कवी नवनाथ रणखांबे उभा आहे.
कवी प्रज्ञावान म्हणजे आपला बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच विचार जर जवळ असतील तर त्या विचारांचा प्रज्ञावंत मळा फुलायला वेळ लागणार नाही असे कवी ‘भीम बाबा’ या कवितेतून पुढीलप्रमाणे सांगतो, —-
एका हातात संविधान
दुसऱ्या हाताने आकाश अन
शहराच्या दिशेने बोट दाखवून
भीम बाबा म्हणालात
” शहराकडे चला….!
कळोखाला पेटवत ….
तुम्ही प्रगती करा…!”
बाबाचं बळ
आहे जवळ,
विचारांची शाळा
प्रगतीचा डोळा
मार्ग सोहळा
फुलला प्रज्ञावंत मळा..!
(प्रेम उठाव /पान नंबर 42)
हे शब्द जणू परिसाचा मळाच ; ज्याला ज्याला स्पर्श करेल ते ते सोनच होणार ! खरंच बाबासाहेब आंबेडकर हे असे परीस आहेत की त्यांचे विचार जो वाचतो स्वीकारतो त्याच आयुष्य सोन्यासारख झाळाळून निघते. कवी बाबासाहेब आंबेडकर फक्त कवितेत मांडत नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यतीत केलेलं जीवन ही जगण्याचं प्रयत्न करत आहे . बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाप्रती आणि ह्या देशाप्रती केलेल्या उपकाराची कवीला जाणीव आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा सारखा प्रज्ञावंत सूर्य फक्त बौद्धांच्या वस्तीसाठीच उगवला असतात तर कदाचित ह्या देशातील ६७४३ जातीच्या वस्तीत आज ही अंधार असतात. हे प्रत्येक धर्मीयांनी जाणवायला हवे . त्या बद्दल कृतज्ञा असायला हवं. पण तस चित्र कमी दिसत म्हणून तर आज बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एकाच चौकटीत आणि एकाच जातीत बांधले जाताना दिसत आहे हे भेद तुटावेत म्हणून कवी ह्या पुस्तकातून बाबासाहेब आंबेडकर असे मांडतात की ते सर्व सामान्य लोकांना बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्धांचे नाहीत तर संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकांचे आहेत हे कवी ह्या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. भीम बाबा गजल मधून इतक्या सरळ आणि सोप्या भाषेत बाबासाहेब आंबेडकर सांगणं हे सोपं नाही पण कवीने ते सांगितले आहे. कवीने ह्या पुस्तकातून मांडलेली कैफियत खरच उल्लेखनीय आणि विस्मरणीय आहे. इतका शब्द भांडार यात मांडला आहे की बरेच नवीन शब्द ही वाचण्यास मिळत आहेत. कवी सांगितलेल्या प्रमाणे कवी एक योद्धा ही जाणवत आहे. कवीच्या रणसम्राट या कवितेतून , —-
“रणांगणात उभा
मी नवनाथ रणखांबे आहे
लढवय्या योद्धा
मी अजिक्य रणसम्राट आहे.”
( प्रेम उठाव / पान नंबर 38)
ह्या रणसम्राट याच कौतुक करावे तितके कमीच आहे.
जीवन संघर्षकार असा हा कवी , ह्या कवीला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या मंगल कामना आणि असेल लिखाण कवी कडून नेहमी होत राहो ही मंगल कामना.
– पुस्तक -: प्रेम उठाव
– कवी -: नवनाथ रणखांबे
– किंमत -: 90 ₹
– पुस्तक परीक्षण -: संघरत्न गणपत घनघाव,
अस्नोलीकर, ता.शहापूर
