Home बीड शेतकरी बापाची आर्थिक फसवणूक; सैनिक मुलाचा प्रशासनाशी संघर्ष; तलावाच्या जमिनीचा मावेजा आधिकारी-ठेकेदारांनीच...

शेतकरी बापाची आर्थिक फसवणूक; सैनिक मुलाचा प्रशासनाशी संघर्ष; तलावाच्या जमिनीचा मावेजा आधिकारी-ठेकेदारांनीच लुटला

74

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.24मार्च):-पाटोदा तालुक्यातील मौजे. मेंगडेवाडी येथील शेतकरी बाबासाहेब रावसाहेब मेंगडे यांची गट क्रमांक १०० मधील दीड एकर जमिन गाव तलाव क्रमांक ५ संचिका क्रमांक एलएनक्यु/एसआर/०८ /२००८ ल. पा.बीड) गेली असून उपजिल्हाधिकारी भु-संपादन ल.पा. तसेच ठेकेदारांनी संगनमतानेच आर्थिक फसवणूक केली असून संबधित प्रकरणात जिल्हाप्रशासन दरबारी हेलपाटे मारून सुद्धा संचिका गहाळ झाल्याचे कारण देत दिशाभूल करत असुन शेतकरी बाबासाहेब मेंगडे यांचा थोरला मुलगा आकाश मेंगडे सैन्य दलात कार्यरत असुन केवळ तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी सुट्टी घेऊन गावी आला असून जिल्हाप्रशासनाशी संघर्ष करावा लागत आहे.

संचिका गायब,
_______________
सदरील तलावाची संचिकाच गायब असल्याचे उपजिल्हाधिकारी भु-संपादन मच्छिंद्र सुकटे व जनमाहिती आधिकारी तथा अ.का. उपजिल्हाधिकारी (भुसंपादन)ल.पा.बीड शेख ए.एम. सांगत आहेत मात्र लेखी देण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आहेत.

गावतलाव क्रमांक ५ ची मोजणीच नाही
_______________________________
उप अधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय पाटोदा यांना माहिती आधिकारात मेंगडेवाडी येथील गावतलाव क्रमांक ५ ची मोजणी झाल्या संदर्भात कागदपत्रे मागितली असता संपादन मंडळ उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांचे कडील प्रस्तावानुसार दि.१३ सप्टेंबर २०१० ते दि. १४ सप्टेंबर २०१० मोजणीची तारीख निश्चित करण्यात आली व तसे संपादन मंडळास कळविण्यात आले परंतु भुमापक जायमोक्यावर गेले असता जायमोक्यावर सिमांकन केले नसल्याने मोजणी करण्यात आली नसल्याचे लेखी दिले आहे.

रोहयोचा तलाव जेसीबी यंत्राणे ८ दिवसात पुर्ण
_________________________________
सदर गावतलाव रोहयो अंतर्गत करण्यात आलेला असून मनुष्यबळ न लावताच जेसीबी यंत्राणे आठवडाभरात उरकण्यात आला होता. एकंदरीतच रोहयो नियमांची मजुराच्या हाताला काम मिळावे याची पायमल्ली करण्यात आल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना तक्रार :- डाॅ.गणेश ढवळे
_________________________________
संबधित प्रकरणात चौकशी करून संचिका गहाळ प्रकरणात तत्कालीन आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच मोजणी न करताच तलावाची निर्मिती तसेच रोहयो नियमांचे उल्लंघन आदि प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना लेखी तक्रार करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here