Home महाराष्ट्र मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात ४ रुग्णावर गर्भाशय शस्त्रक्रिया रुग्णावर संपन्न !

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात ४ रुग्णावर गर्भाशय शस्त्रक्रिया रुग्णावर संपन्न !

113

🔸हजारो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत !

🔹उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना मिळत आहे दिलासा !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.20मार्च)’:- येथील उपजिल्हा रुग्णालयामधे महात्मा ज्योतिरव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत ४ गर्भ पिशवी रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून शिबीर संपन्न झाले. शिबिराचे उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करून तब्बल ४ बिन टाक्याच्या यशस्वीरीत्या पार पडल्या . या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार, सर्जन , डॉ श्यामकुमार सिरसाम, डॉ अंकुश अजमेरा, डॉ प्रवीण देशमुख, डाॅ रेणुका पाटील , डॉ रावसाहेब खूपसे, सचिन पाटील व भुलतज्ञ डॉ.जगदीश काळभोर डॉ रमेश डकरे , डाॅ हर्षाली पावडे उपस्तीत होते हे शिबिर जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौदंळे, डॉ प्रशांत घोडाम, डॉ . रणमले ,डॉ सुमेध चत्से,डाॅ भिसे, सुशिल तिवारी यांचे मार्गदर्शना खाली पार पडले तसेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील, डॉ सचिन कोरडे स्त्री व प्रसूती रोग तज्ञ डॉ रावळणी , डॉ संगोळे, मीनाक्षी वागारे, रूथ लोखंडे, सुजित वानखडे, रेश्मा बहुरूपी, वाष्णवी जोशी प्रवीण कापडे, सतीश देवगडे कमला तायवाडे महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजने तील वाशीम शेख प्रकाश पांडे,सुजाता पांडे,सर्व अधिकारी व कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेकरीता यांनी अथक परीश्रम घेतले. शिबिराचे समारोप रुग्णांच्या वैयक्तिक भेटी घेऊन व सविस्तरपणे माहिती देऊन करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here