Home महाराष्ट्र आमदार म्हणतात, आज माझी परीक्षा आहे

आमदार म्हणतात, आज माझी परीक्षा आहे

136

🔹आ.डॉ.गुट्टेंचा फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी थेट संवाद

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21मार्च);-गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहे. त्यामुळे आज माझी परीक्षा आहे. मी चांगला अभ्यास करुन आलोय. त्यामुळे तुम्ही मायबाप जनताच माझे पास- नापास ठरवा. कारण, मी तुमचा सेवक आहे, अशी साद गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी सर्वसामान्य जनतेस फेसबुक लाईव्ह द्वारे घातली.

२०१९ मधील विधानसभा निवडणूक जिंकल्यापासून आजपर्यंत गंगाखेड विधानसभेत केलेल्या सर्व कामांची आकडेवारीसह विस्तृत माहिती आ.डॉ.गुट्टे यांनी दिली. तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले महत्त्वकांक्षी प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न, भविष्यात होणार असलेली कामे याचाही आढावा त्यांनी सांगितला. तसेच तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. त्यामुळे संकटात पाठीशी उभे राहिलेले मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि मायमाऊंल्यांचे त्यांनी आभार मानले.

आजपर्यंत २०६ सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम केले आहे. तरीही कोणत्याही गावात सभागृह बांधकाम करायचे असेल, तर पाहिजे त्याला सभागृह देतो. तसेच मतदार संघातील ८६ तांड्यावर सेवालाल महाराज सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करणार आहे. गावोगावी रस्ते, नाली आणि पेव्हर ब्लॉक बसविणे याकडेही विशेष लक्ष देणार असल्याचे आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.

फेसबुक लाईव्हच्या शेवटी त्यांनी कमेंट मध्ये लोकांनी मांडलेल्या अडचणी, समस्या, प्रश्न विचारात घेऊन लगेचच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी लोकांनी सकारात्मक कमेंट देऊन आ. डॉ. गुट्टेंच्या ऑनलाईन संवादास प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here