Home चंद्रपूर दिव्यांगांना मोफत कॅलीपर आणि जयपुर फुट वितरण

दिव्यांगांना मोफत कॅलीपर आणि जयपुर फुट वितरण

97

🔹जैन भवनात पहिल्याच दिवशी ४०० दिव्यांगांनी घेतला लाभ

🔸जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी केले मोलाचे योगदान

✒️चंद्रपूर प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

चंद्रपूर(दि.21मार्च):-शांतीनाथ सेवा मंडळ, रुरल कारपोरेशन लिमिटेड, सकल जैन समाज चंद्रपूरचे वतीने आठवडाभर दिव्यांग सेवा शिबिर आयोजित करण्यात आले.मागिल कित्येक वर्षांपासून माजी खासदार नरेशबाबु पुगलिया ह्यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर येथिल शांतीनाथ सेवा मंडळ, रुरल इलेक्ट्रिशियन कारपोरेशन , सकल जैन समाज तथा महावीर विकलांग सेवा समिती जयपुर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. २० मार्च ते २७ मार्च दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन जैन भवन, पठाणपुरा रोड येथे आज दि. २० मार्च रोजी जैन सेवा समितीच्या अध्यक्षा शकुंतला बांठीया ह्यांच्या अध्यक्षतेत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले ह्यावेळी चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोले, गडचिरोली येथिल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, मुंबईचे डॉ. डी.के मेहता व जयपुर येथील नारायण व्यास, योगेश भंडारी, डॉ. महावीर सोईतकर, निर्दोष पुगलिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिबिराच्या उद्घाटनावेळी जैन भवन दिव्यांग लाभार्थी बांधवांनी तुडुंब भरून गेले होते. उद्घाटन समारंभ आटोपताच दिव्यांग बांधवांची तपासणी तसेच आवश्यकतेनुसार कॅलिपर, जयपुरी पाय तसेच कुबड्यांचे मोफत वितरण सुरू झाले असुन पहिल्याच दिवशी ४०० दिव्यांग बांधवांनी शिबिराचा लाभ घेतला. गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी शिबिरासाठी अमूल्य असे मौलिक सहकार्य केले . डॉ.अनिल रुडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास २०० गरजु दिव्यांग बांधवांना शिबिरात आणले व त्यांना मोफत साहित्य मिळवुन देण्यात मोलाचा वाटा उचलला.

यावर्षी हे शिबिर विदर्भ स्तरावर घेण्यात घेत असुन ह्या शिबिराचा लाभ चंद्रपूर सह यवतमाळ तसेच गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग बंधु भगिनींना होणार आहे. २० ते २७ मार्च दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत शिबिर सुरू राहणार असून नियोजनाप्रमाणे पाहिले तिन दिवस चंद्रपूर जिल्हा, २३ व २४ मार्च यवतमाळ तसेच २५ ते २७ मार्च गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आले असुन काही कारणास्तव कुठल्याही जिल्ह्यातील दिव्यांग बांधव नियोजित दिवसा व्यातिरिक्त इतर दिवशी आल्यास त्यांना आवश्यक ती मदत पुरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष जैन, राज पुगलिया, संदीप बाठीया, अशोक बोथरा, जितेंद्र चोरडिया, प्रशांत बैद, अनिल बोथरा, सुनील पंचोली, नरेश तालेला, जितेंद्र मेहेर, गौतम कोठारी, अभय ओसवाल, अमित पुगलिया, सुरेंद्र बाठीया, डॉ. सोनोले, सतपाल जैन,राजश्री बैद, अर्चना मुनोत, दर्शना मोदी, लीलावती जैन, सरला बोथरा, व यांचेसह सकल जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here