सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.11मार्च):- जागतिक महिला दिना निमित्याने चिमूर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने ११मार्चला डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपूर येथील ग्रामपंचायत भवन येथे महिला मेळावा घेण्यात आला .
या मेळाव्यात शंकरपूर येथे ज्या महिलांनी स्वतःला सावरून स्वतःचा संसार सुरळीत केला व आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन घडवलं तर काही महिलांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा केली त्या सर्व महिलांचा सत्कार साडी चोडी शाल व श्रीफळ देऊन मान्यवराच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या महिला मेळाव्याला चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतीश वारजुकर, माजी उपसभापती रोशन ढोक, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नम्रताताई ठेमस्कसर, तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष सविताताई चौधरी, अनिताताई वारजुकर, माजी अध्यक्ष चिमूर तालुका काँग्रेस कमिटी लताताई अगडे,माजी पंचायत समिती सदस्य भावनाताई बावनकर, माजी पंचायत समिती सभापती शोभाताई पिसे, माधुरीताई रेवतकर,भावनाताई पिसे, ढाकूनकर मॅडम, डॉ. शेख मॅडम, कमलताई राऊत, नीताताई बावनकर, सुषमाताई राहूड, राऊत मॅडम गावातील समस्त महिला मंडळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संचालन मोहीनीताई गौरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जोत्सनाताई गोहने यांनी मानले.




