सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995469
उमरखेड(दि.8मार्च):-ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे,.
तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…!
महिला दिनाच्या औचीत्याने शहीद भगतसिंग नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, उमरखेड येथे शाळेचे मुख्याध्यापक पद एका महिला शिक्षेकेकडे सोपवून महिला दिनानिमित्त शाळेतील महिला शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांना वेगळ्या प्रकारे गौरविण्यात आले.
पहिल्या सत्रात शाळेतील महिला शिक्षकांनी शालेय प्रशासन अगदी योग्य प्रकारे सांभाळले.
दुसऱ्या सत्रात महिला दिन व रंगपंचमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात महिला शिक्षिकानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी पण आपले विचार मांडले.नंतर विद्यार्थ्यांनी रंगपंचमी निमित्त रंगांची उधळण केली.
आजच्या शाळेच्या मुख्याध्यापिका, श्रीमती भाग्यश्री सोनेवार मॅडम, सौ. पोंगाने मॅडम, कु. प्रतिपदा शिंदे मॅडम, कु. योगिता नरवाडे मॅडम, सौ. अर्चना नंदनवार मॅडम, सौ. श्रद्धा बोके मॅडम, श्रीमती वाढवे ताई, सौ. टेंभरे ताई व सौ. पाईकराव मावशी या सर्वांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासठी मेहनत घेतली.




