✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.8मार्च):-मुलं म्हणलं की त्याचे गोडवे गायले जातात बंजारा समाज मुलाचा बारशाचा कार्यक्रम करून होळीनिमित्त अनोखा सन साजरा करतात मात्र गेवराई तालुक्यातील जयरामनाईक तांड्याचे सरपंच श्री. विष्णु रामभाऊ राठोड यांचे कुटुंबिय मागील पाच वर्षापासुन मुलगा मुलगी समान हे ध्येय समोर ठेऊन मुलांबरोबर मूलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी बंजारा समाजात होळी सनाला मुलांचे बारसे धुंड करण्याची प्रथा आहे.
मुलांबरोबर मूलींचे देखील बारसे व्हावे यासाठी मुलींना कपडे शकर हार, खोबराहार व मूलींच्या आई वडिलांचा विशेष सत्कार करुन गाव तांड्यात स्त्री पुरुष समानता आणण्यासाठीचा एकलहाणसा प्रयत्न आसल्याचे सरपंच विष्णू रामभाऊ राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले




