Home बीड ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या दारी’‌ बुधवारी बीड जिल्ह्यात – बाजीराव ढाकणे

‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या दारी’‌ बुधवारी बीड जिल्ह्यात – बाजीराव ढाकणे

76

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.२६फेब्रुवारी):- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी बुधवार दि.०१ मार्च २०२३ जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या अॅड.संगिता चव्हाण व इतर सर्व सदस्या व महिला आयोगाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. तरी बीड जिल्ह्यातील महिलांच्या संदर्भातील तक्रारी घेऊन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपस्थित रहावे असे लेक लाडकी अभियान चे बीड जिल्हा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे.

त्यानंतर अध्यक्षा चाकणकर बीड जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. उपरोक्त सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे होणार आहेत.महाराष्ट्र राज्य महिला आयोग राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन , विधी सल्लागार , समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग या द्वारे करत आहे. असे लेक लाडकी अभियान चे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे.बीड जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणीस अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here