Home चंद्रपूर धोबी परीट जनकल्याण संस्था घुग्घुसतर्फे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजांच्या १४७ व्या...

धोबी परीट जनकल्याण संस्था घुग्घुसतर्फे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजांच्या १४७ व्या जयंती महोत्सवाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

67

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.25फेब्रुवारी):-येथील धोबी परीट जनकल्याण संस्थेतर्फे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजांची १४७ व्या जयंती महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, २४ फेब्रुवारीला संत गाडगे महाराज स्मारक भवन, वार्ड क्रमांक ६ जनता महाविद्यालय रोड, घुग्घुस येथे थाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटक भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, प्रमुख पाहुणे म्हणुन, डी. डी. सोनटक्के, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धोबी परीट सर्व भाषिक महासंघ, भय्याजी रोहनकर, प्रदेश उपाध्यक्ष, अनिल तुंगीडवार, विश्वनाथ मुक्के अध्यक्ष धोबी समाज चंद्रपूर, नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, भाजपाचे साजन गोहने, महेश लठ्ठा, संजय भोंगळे उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.सकाळी भजन कार्यक्रम, प्रबोधनकार कैलास महाराज खडसाने यांचे कीर्तन, सायंकाळी महाप्रसाद असे कार्यक्रम घेण्यात आले.गुरुवार, २३ फेब्रुवारीला सकाळी गजानन चिंचोलकर महाराज यांच्या हस्ते प्रतिमेची पुजा व घटस्थापना, ग्राम स्वच्छता अभियान व रॅली, रात्री उदयपाल वणीकर महाराज यांचे भव्य कीर्तन असे कार्यक्रम घेण्यात आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सचिन क्षीरसागर, उपाध्यक्ष विलास भोस्कर, सचिव निलेश मुक्के, कोषाध्यक्ष बाबाराव बोबडे, सहसचिव रामू भसारकर, सहकोषाध्यक्ष बंडू तुराणकर, संघटक बबन पत्रकार, शेखर तंगल्लापेल्ली, बंटी भोस्कर, चंदन तुराणकर, रामदास क्षीरसागर, विजया बंडेवार, गीता क्षीरसागर, शीतल क्षीरसागर, रंजना भोस्कर, वंदना क्षीरसागर, मीनाक्षी दाढे, कल्पना तुराणकर, माधुरी क्षीरसागर यांनी प्रयत्न केले.यावेळी मोठ्या संख्येत धोबी परीट समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here