Home गडचिरोली आम . देवराव होळींच्या उपस्थितीत गडचिरोली पं .स ची आमसभा वादळी

आम . देवराव होळींच्या उपस्थितीत गडचिरोली पं .स ची आमसभा वादळी

90

🔸संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावण्यांचा आयोजक आणि राजकारण्यांना विसर?

🔹मुकुंदराव उंदिरवाडे यांनी लक्षात आणून दिली चुक.

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.23फेब्रुवारी):-गडचिरोली पंचायत समितीची वार्षीक आमसभा आमदार डॉ . देवराव होळी यांच्या अध्यक्षते खाली पार पडली . सदर सभेला आमदार होळी, बिडिओ साळवे ‘ माजी सभापती मारोतराव ईचोळकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे तसेच विविध खाते प्रमुख, कर्मचारी , बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .आमदार होळी यांचे आगमन होताच पुलखल च्या महिलांनी ग्रामसेवक फुलझेले यांना हटवा या मागणी साठी आमदारांना घेराव घातला. तेव्हा आमदार महाशयाने मुख्य कार्यपालन अधिकारी. जि . प . गडचिरोली यांना तातडीने फोन करून प्रकरण तात्पुरते शांत केले .

सभेला लोकशाही – संविधान या विषयावर चर्चा सुरु असतांना सभेच्या ठिकाणी संत गाडगेबाबा , संत तुकडोजी महाराज या दोनच महापुरुषाचे फोटो लावण्यात आले होते . व संविधानाची चर्चा सुरु होती . त्यावर अंपग ( दिव्यांग ) नागरिक मुकुंदराव उंदिरवाडे यांनी सभेतील माईक हिसकावून ठणकावून सांगीतले की ‘ आपण संविधान लोकशाहीच्या चर्चा करणारे अधिकारी या खुर्च्यांवर बसण्याचा अधिकार व आरक्षण ज्या महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दिले त्या संविधान कर्त्याचा फोटोच आमसभेत नाही यावर वादंग माजले आयोजकाला लोकशाहीचा विसर पडला हि गंभीर बाब आहे याचे आश्चर्य वाटतो .नाईलाजाने आमसभा बंद पाडण्यात आली तेव्हा सर्वानी सर्व प्रथम मसाला भाताचा आस्वांद घेतला.

तेव्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा फोटो लावून त्यांना प्रतिमेला हार घालुन आमसभेला पुन्हा सुरुवात करण्यात आली . पुन्हा ग्रामपंचायत पुलखल चे अनु . जातीचे ग्रामसेवक फुलझेले यांची बदली करा असे पुलखल वासीयांनी तक्रार केली असता आमदारानी त्या ग्राम सेवकांस सात दिवसाचे आत पुलखल ग्रा. प . मधुन हाकला असा आदेश बिडिओला देताच पुलखल चे सरपंच व सदस्यांनी . तुम्ही कोण होता बदली करणारे ‘ पहिले ग्रामसेवकाचा दोष दाखवा असे म्हटले तेव्हा पुलखल चे नागरिक व ग्रा. प . सरपंच , सदस्य हमरीतुमरीवर येवून शाब्दिक बाचाबाची झाली. आणि आमसभेत गोंधळ निर्माण झाला. डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आमसभेत न लावणार्‍या आयोजकावर कारवाई करण्याची मागणी मुकुंदराव उंदिरवाडे (दिव्यांग ) यांनी केली .

व सदर घटनेचा निषेध केला. तर रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सुध्दा सदर घटनेचा निषेध करून सदर घटनेची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केली . दिव्यांग मुकुंदराव उंदिरवाडे यांनी जिल्हा परिषद मुख्य गेट समोरील हटविण्यात आलेला डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोबाबत सिईओ , जि . प . गडचिरोली याचेकडे तक्रार करून डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा पुन्हा त्याच ठिकाणी लावण्यास सिईओ ना भाग पाडले होते . उंदिरवाडे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले हे विशेष .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here