Home पुणे शिवसेना खेड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या चुकीच्या...

शिवसेना खेड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर निषेध आंदोलन

76

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे जिल्हा प्रतिनिधी)

पुणे(दि.23फेब्रुवारी):-केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण या चिन्हा बाबत चुकीचा निर्णय दिल्याने शिवसेना खेड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राजगुरुनगर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शाखा खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली.त्यानंतर पुणे नाशिक हायवेवर निषेध आंदोलन करण्यात आले. खेड तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने खेड पोलीस स्टेशनचे पीएसआय भारत भोसले साहेब यांना निवेदन देण्यात आले. सर्वांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी रामदास आबा धनवटे. बाबाजीशेट काळे. अमोल पवार, विजयाताई शिंदे, सुरेश चव्हाण, व इतर मान्यवरांनी आपली भावना व्यक्त करताना केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या विरोधात व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणा देत आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते त्यात प्रामुख्याने बाळासाहेब ताये, सचिन राक्षे, पी डी पाटील, अनिल मिसर, बाप्पू गोरे, सुदाम कराळे,शंकर दाते, लक्ष्मण जाधव,संदीप गाडे, महादेव लिंबोरे, सुनील बोंबले, दत्तात्रय टाकळकर, मृण्मय काळे, राहुल मलघे,अशोक मुके, बाळासाहेब येवले, किरण गवारे, हनुमंत थोरवे, बाबा इनामदार, चैतन्य गायकवाड, संतोष राक्षे, अजिंक्य गाडे, कविता गिलबिले, सीमा बोंबले, अर्चना सांडभोर, नंदा धायबर, व इतर जेष्ठ शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here