Home चंद्रपूर बोधिसत्व बुद्धविहारात शिवाजी महाराजांना अभिवादन

बोधिसत्व बुद्धविहारात शिवाजी महाराजांना अभिवादन

103

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपर(दि.21फेब्रुवारी):-रयतेचे राजे ,बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कार्यक्रम बाबुपेठ गौरीतलाव येथील बोधिसत्व बुद्धविहारात पंचशील बौद्ध मंडळ व रमाई महिला बौद्ध मंडळाच्या संयुक्त विध्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचशील बौद्ध मंडळाचे अध्यक्ष सुधाकर वाकडे तर मंचावर मंडळाचे सचिव धर्मराव सहारे, रमाई मंडळाच्या अध्यक्षा पल्लवी खोब्रागडे, सचिव स्मिता ढवळे उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांनी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमाना दिप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.

समाजात जातीय वैमनस्य पसरवणाऱ्या शक्तीच्या प्रचाराला आळा बसावा.तसेच समाज जीवनात प्रवेश करणाऱ्या तरुण पिढीला इतिहासाचे नावे भान देण्याचे कार्य पंचशील मंडळाच्या नवनियुक्त कार्यकारणीने हाती घेतलेले असून बहुजन समाजाच्या उत्थानासाठी झटणाऱ्या तमाम महापुरुषांचे कार्यचा वसा समाजात रुजवत ठेवण्यासाठी त्यांच्या कार्याचा सन्मान व गुणगौरव करण्यासाठी त्यांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा घेतलेला उपक्रम हा अभिमानास्पद असल्याने सर्व समाजबंधवानी अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करीत छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य कसे सुराज्य झाले याबाबत सविस्तर माहिती कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना जितेंद्र डोहणे यांनी दिली.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर वाकडे .धर्मराव सहारे, पल्लवी खोब्रागडे,लीना डांगे, पौर्णिमा निमगडे, संघदीप वाघमारे, छाया हनुमंते, यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी शिवाजी महाराजावर साधना बारसागडे यांनी गीत सादर केले तर जितेंद्र डोहणे यांनी गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यागीत सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन सुरज कदम,तर आभार सोनाली वाकडे यांनी मानले.यावेळी बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here