Home महाराष्ट्र सत्यशोधक चित्रपट शोरील चा उद्घाटन सोहळा मंत्री अतुल सावे यांचे उपस्थितीने शानदारपणे...

सत्यशोधक चित्रपट शोरील चा उद्घाटन सोहळा मंत्री अतुल सावे यांचे उपस्थितीने शानदारपणे संपन्न झाला

164

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.18फेब्रुवारी):- समता फिल्म्स तर्फे सत्यशोधक चित्रपटाचे शोरील उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे सहकार व इतर मागावर्गीय कल्याण विभाग मंत्री नामदार अतुल सावे यांचे शुभहस्ते पिंपरी येतील ASM कॉलेज ऑडिटोरियम शानदार पणे दि.17.2.23 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी जेष्ठ नेते वसंत लोंढे , माजी स्थायी समिती अध्यक्ष ,नगरसेवक संतोष लोंढे, प्राचार्य अडसूळ,सी ए.सुहास गार्डी ,सत्यशोधक चित्रपट निर्माते आप्पा बोराटे,प्रवीण तायडे, शिवा बागुल ऍड.विद्या शिंदे, नगरसेवक रेखा दर्शले ,वसंत बोराटे, माणिक मेहत्रे,मंदाताई आल्हाट,बाळासाहेब बांगर, अरुण बोऱ्हाडे, प्रशांत व रामचंद्र डोके,अशोक वैरागर, बाळासाहेब मोहळकर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री सावे साहेब म्हणाले की राजकारणात येण्या पूर्वी बरेच वर्ष सिनेमागृह चालविले असून अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पाहिले असून त्यातील प्रत्येक अडचणीची व चित्रपट शो लागून चालविण्यासाठी काय काय करावे लागते याचा मला मोठा अनुभव असून या सर्व गोष्टीतून मी गेलेलो आहे.महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा महात्मा फुले यांच्या चित्रपट काढू म्हंटले पण अजून सुरुवात नाही परंतु आप्पा बोराटे यांनी हा चित्रपट अंतिम टप्प्यात आणला आहे याला सरकार व समाज नक्कीच मदत करेल. फुले दाम्पत्याचे महान कार्य जगाचे तळागाळापर्यंत पोहचेल असे सारे मिळून सहकार्य करू या. असे देखील सावे साहेब म्हणाले.

यावेळी सुरुवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास मंत्री सावे व सत्यशोधक चित्रपट निर्माते यांचे शुभहस्ते पुष्पहार घालण्यात आला.तर आप्पा बोराटे यांनी क्रांतीरत्न ग्रंथ सावे साहेब यांना भेट दिला आणि कॉलेज ने सभागृह उपलब्ध करून दिला म्हणून फुले एज्युकेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी कॉलेज प्रतिनिधी गणेश गायकवाड यांना मंत्री सावे साहेब हस्ते फुले दाम्पत्य फोटो फ्रेम भेट दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत माळी यांनी केले तर सत्यशोधक चित्रपट निर्मिती अडचणी , कोव्हीड मुळे बजेट इतर सविस्तर माहिती देऊन हा चित्रपट तयार करण्यासाठी जमीन विकावी लागली अशी माहिती दिली.त्यामुळे आज अनेक मान्यवरांनी निधी देण्याची घोषणा केली पण चित्रपट प्रबोधनासाठी लवकर येऊ ध्या अशी मागणी अनेकांनी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्न्हेल बाळसराफ व बागुल यांनी केले तर कार्यक्रमाचे सुरुवातीला म्हातमा फुले रचीत सत्याचा अखंड सत्यशोधक ढोक यांनी गावून सर्वांकडून वधवून घेतला.
यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातील विविध संघटनेचे पदाधिकारी , सर्व समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळी सत्यशोधक चित्रपट सुरू झाले पासून चे कामकाज चित्रीकरण देखील दाखविल्याने व चित्रपट शोरील पाहून अनेकांनी उत्तम प्रतिक्रिया दिल्याने सर्वानाच चित्रपट कधी येणार याची आतुरता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here