Home महाराष्ट्र डोंगर यावली येथील शेकडो विद्यार्थी व गावकऱ्यांना मिळाला दिलासा !

डोंगर यावली येथील शेकडो विद्यार्थी व गावकऱ्यांना मिळाला दिलासा !

140

🔹अखेर डोंगर यावली येथे बसले स्पीड ब्रेकर !

🔸उपसरपंच कांचन कुकडे, मनीष गुडधे यांच्या प्रयत्नांना यश !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.18फेब्रुवारी):- तालुक्यातील हिवरखेड दापोरी डोंगर यावली येथून क्षेत्र सालबर्डी येथे जाण्याकरिता नवीन मार्गाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र याच रस्त्याला हीवरखेड, घोडदेव, दापोरी, सालबर्डी रस्ते जोडलेले असल्यामुळे हा रस्ता वर्दळीचा असल्याने वाहनेही भरधाव वेगाने येत असतात. काही दिवसात आधी याच मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे डोंगर यावली येथील महादेव मंदिरा जवळील धोकादायक वळणावर लग्नाची वरात घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यामुळे शेकडो प्रवासी जखमी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांना शाळेसाठी रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याने डोंगर यावली येथे गतिरोधक बसविण्याची मागणी उपसरपंच कांचन कुकडे, मनीष गुडधे यांनी रेटून धरली होती.

डोंगर यावली येथे महत्त्वाच्या व गरजेच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी उपसरपंच कांचन कुकडे यांनी 31/07/2021 रोजी केली असून मनीष गुडधे यांनी दिनांक 21/07/2021 रोजी डोंगर यावली येथे गतीरोधक बसविण्याच्या मागणीचे निवेदन व परिपूर्ण प्रस्ताव आमदार देवेंद्रजी भुयार, जिल्हाधिकारी अमरावती, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती, जिल्हा रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समिती अमरावती, यांच्याकडे सादर केल्यामुळे उपसरपंच कांचन कुकडे , मनीष गुडधे यांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हा रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समिती अमरावती यांनी 15/02/2022 रोजी डोंगर यावली येथे गतिरोधक बसविण्याची परवानगी दिली आहे. डोंगर यावली येथे वाढलेल्या अपघाताला आळा बसावा म्हणून उपसरपंच कांचन कुकडे, मनीष गुडधे यांच्या मागणीमुळे हे काम ने पूर्णत्वास आले आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेऊन आमदार देवेंद्र भुयार, यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी अमरावती, जिल्हा रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समिती यांना डोंगर यावली येथे तत्काळ स्पीड ब्रेकर बसविन्याचे निर्देश दिल्यामुळे डोंगर यावली येथे स्पीड ब्रेकर बसविण्यात आले असून डोंगर यावली येथील विद्यार्थ्यांना व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

डोंगर यावली येथील मार्गावर गतिरोधक नसल्याने गावकरी व शेकडो पालकांच्या चिंतेत भर पडली होती. गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याआधी संबंधित विभागाने आमच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी रेटून धरल्यामुळे डोंगर यावली गावामध्ये गतिरोधक बसविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. — कांचन कुकडे उपसरपंच ग्रा. पं. डोंगर यावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here