Home महाराष्ट्र घोडदेव रस्त्यावरील बेशरम आंदोलनानंतर रस्त्याच्या कामाचा निघाला मुहूर्त !

घोडदेव रस्त्यावरील बेशरम आंदोलनानंतर रस्त्याच्या कामाचा निघाला मुहूर्त !

90

🔹स्थगिती उठविण्यासाठी बेशरमचे झाड लावून केला होता शासनाचा निषेध !

🔸डोंगर यावली घोडदेव येथील नागरिकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.17फेब्रुवारी):-तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्रातील शेवटच्या घोडदेव गावाला जोडणारा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या आठमुठ्या धोरणामुळे डोंगर यावली घोडदेव मार्गाची अवस्था गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत खराब झाली असून हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला असल्यामुळे या गावामध्ये ऑटो व इतर वाहने सुद्धा जाण्यास तयार होत नसल्यामुळे शालेय विद्यार्थी, रुग्ण, नागरिकांवर पायदळ प्रवास करण्याची अतिशय वाईट वेळ आली असतानाही त्याकडे शासन लक्ष देण्यास तयार नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे घोडदेव डोंगर यावली येथील नागरिकांना न्याय मिळऊन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, उपसरपंच कांचन कुकडे , मनीष गुडधे, यांनी घोडदेव रस्त्यावर बेशरम चे झाड लाऊन आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त करून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 घोडदेव रस्ता ग्रामिण मार्ग क्र. १५ असुन हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाल्यामुळे सदर रस्त्याच्या कामावर आमदार देवेंद्र भुयार यांनी ३०५४ म्हाडा मिनीमाडा ३०४४/०३०६ व ३०५४/०४०७ या लेखाशिर्षका अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सा. क्र. ०/०० ते १/२०० मध्ये रस्ता सुधारण्याचे कमा करीता ३० लक्ष रुपये, तसेच ३०५४ गट ब अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये २० लक्ष रुपये असे एकूण ५० लक्ष रुपयांचे काम मंजुर करून दिले होते मात्र या कामांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्यामुळे घोडदेव डोंगर यावली रस्त्याचे काम थंड बस्त्यात पडले होते.

डोंगर यावली घोडदेव रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले तरीही रस्त्याचे काम होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, उपसरपंच कांचन कुकडे , मनीष गुडधे, यांच्या नेतृत्वात डोंगर यावली घोडदेव रस्त्यावरील खड्ड्यावर बेशरमचे झाड लावून शासनाचा निषेध करून सदर कामावरील स्थगिती उठविण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. अखेर शासनाने बेशरम आंदोलनाची दखल घेऊन सदर कामावरील स्थगिती उठविण्याची सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचा मुहर्त मिळाला आहे.

डोंगर यावली घोडदेव रस्त्याच्या कामसाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी घोडदेव रस्ता सुधारण्याच्या कामा करीता ३०५४ गट ब अंतर्गत २० लक्ष रुपये मंजूर केले असून गट ब अंतर्गत २० लक्ष रुपयाच्या कामावरील स्थगिती उठविण्याची मागणी सुद्धा आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून आमदार देवेंद्र भुयार यांनी डोंगर यावली घोदडेव रस्त्याच्या कामाकरीता ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल घोडदेव डोंगर यावली येथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

रस्ता नसलेली महाराष्ट्रातील अनेक आदिवासी गावं आजही
विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. मोर्शी तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेला जोडणारे घोडदेव गाव अशाच अनेक गावांपैकीच एक आदिवासी गाव, एका रस्त्याने आडलेल्या या गावातील लोकांच्या जगण्याचा मार्ग सरकार कधी सुकर करणार? हाच प्रश्न येथील आदिवासी बांधवांना पडलेला आहे. पाचशेहून अधिक आदिवासी लोकवस्तीच्या गावाला जोडणारा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here