रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि. 14 फेब्रुवारी):-रनमोचन येथून लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात नामकरण विधीच्या सोहळ्यासाठी वराड्याला घेऊन जात असलेला मिनीडोर दिनांक साहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील टिळक नगर येथे पलटी झाल्याने बरेच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर योगिता विनोद दोनाडकर रनमोचन गावातील 32 वर्षीय महिला अपघातात गंभीर झाली होती. त्यांना त्वरित गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.
मात्र त्यानंतरही त्रास वाढत असल्याने त्यांचे पती पत्रकार विनोद दोनाडकर यांनी चौगान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना फोन करून विनंती केल्याने उपचारासाठी त्वरित प्राथमिक बोलावून घेतले. व उपचार सुरू केले आहे.. अपघातातील त्या महिलेवर आजही उपचार सुरू आहेत.
यावेळी डॉक्टर.एम एस सुखदेवे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान, राजेंद्र गुनशेट्टीवार, आरोग्य सेविका भाग्यश्री भुरसे, सुरेश बगमारे,(आरोग्य सेवक) रुपेश मेश्राम, एस .ए.जरादे(आरोग्य सहायक) प्रदीप मेहर (परिचर)खरकाडा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिऊरकार दिनेश शिवनकर उपस्थित होते.




