✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.तालुक्यात वाळू माफियांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३५ ब्रास वाळू, ट्रॅक्टर, केणी असा सुमारे ४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी विजय भारत जायगुडे याला तब्यात घेतले आहे. गंगावाडी शिवारातील गोदावरी नदी पात्रात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली.
या धाडीत १ लाख ७५ हजार रुपयांची ३५ ब्रास वाळू तसेच वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारी केणी आणि वाहतुकीसाठीचे ट्रॅक्टर असा ३ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन आलगट यांच्या फिर्यादीवरून तलवडा पोलीस ठाण्यात विजय जायगुडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.




